शिवजयंतीला युवकाचा खून करणाऱ्या 'त्या' ४ आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा
By अझहर शेख | Updated: March 26, 2025 19:09 IST2025-03-26T19:09:32+5:302025-03-26T19:09:32+5:30
प्रत्यक्षदर्शी पुराव्यासह अन्य साक्षीदारांनी दिलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने चौघांना दोषी धरले.

शिवजयंतीला युवकाचा खून करणाऱ्या 'त्या' ४ आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा
अझहर शेख
नाशिक : पाथर्डी गावाच्या शिवारातील दाढेगाव रस्त्यावर २०१९ साली शिवजयंतीच्या दिवशी चौघा जणांनी तीन अल्पवयीन गुन्हेगारांच्या मदतीने एका युवकावर शस्त्रांनी प्राणघातक हल्लाच चढवून गंभीर जखमी करत ठार मारल्याची घटना घडली होती. या प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश नितीन जीवने यांनी चौघा आरोपींना आजन्म कारावास व ४० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.
इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दाढेगाव रस्त्यावर १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास रितेश अनिल पाईकराव (१९, रा.सुकदेवनगर, पाथर्डी) याच्यावर आरोपी उमेश कोंडीबा आव्हाड (१८), नरेश नाना दोंदे (१८), नयन सुरेश शिंदे (१९), अविनाश प्रल्हाद सावंत (१८) या चौघांनी त्यांच्या इतर तीन विधीसंघर्षित बालकांना सोबत घेऊन चाकू, चॉपर, गुप्ती व तलवारीने हल्ला केला होता. पाईकराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी तत्कालीन उपनिरीक्षक आर.सी.शिंदे यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करत, आरोपींविरुद्ध न्यायालयात सबळ पुराव्यांसह दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता डॉ.सुधीर कोतवाल यांनी कामकाज केले. यावेळी कोतवाल यांनी आठ साक्षीदार तपासले. मयत रितेशचे वडील आणि जावई सुरेश गायकवाड यांचा प्रत्यक्षदर्शी पुराव्यासह अन्य साक्षीदारांनी दिलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने चौघांना दोषी धरले.
रक्तबंबाळ अवस्थेत पित्याने मुलाला उचलले
रितेशचे वडील गुन्ह्यातील फिर्यादी अनिल पाईकराव (४४) यांच्या लक्षात आली असता, त्यांनी धाव घेत हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्नही केला होता. यावेळी हल्लेखोरांनी तेथून पळ काढला असता, गंभीररीत्या जखमी रितेश यास रक्तबंबाळ अवस्थेत उचलून रिक्षामधून शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून त्यास मयत घोषित केले. ही बाब रितेशचे वडील गुन्ह्यातील फिर्यादी अनिल पाईकराव (४४) यांच्या लक्षात आली असता, त्यांनी धाव घेत हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्नही केला होता. यावेळी हल्लेखोरांनी तेथून पळ काढला असता, गंभीररीत्या जखमी रितेशला पाईकराव यांनी उचलून रिक्षामधून शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून त्यास मयत घोषित केले होते.