जेवण करताना पंक्चर काढणाऱ्या कामगारावर चाकूहल्ला; ५ तासांत आरोपींना बेड्या

By अझहर शेख | Published: September 25, 2023 01:58 PM2023-09-25T13:58:05+5:302023-09-25T13:58:22+5:30

शहाबाज यास फिर्यादी कौसर व त्याच्या मित्रांनी जवळच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

In Nashik Knife attack on puncture worker while eating; Shackles to the accused in 5 hours | जेवण करताना पंक्चर काढणाऱ्या कामगारावर चाकूहल्ला; ५ तासांत आरोपींना बेड्या

जेवण करताना पंक्चर काढणाऱ्या कामगारावर चाकूहल्ला; ५ तासांत आरोपींना बेड्या

googlenewsNext

नाशिक : पाथर्डी गावाच्य चौफुलीवर असलेल्या एका पंक्चर दुकानदारावर चाकूहल्ला करून गंभीररित्या जखमी करण्यात आल्याची घटना घडली होती. या हल्ल्यातील चौघा संशयित हल्लेखोरांना इंदिरानगर गुन्हे शोध पथकाने अवघ्या पाच तासांत बेड्या ठोकल्या.

पाथर्डी गाव चौफुलीवर चांद टायर नावाने पंक्चरचे दुकान आहे. पंक्चर काढणारा कारागीर शहाबाज आलम याच्यावर चाकूहल्ला करून त्याच्यासोबत असलेला फिर्यादी कौसर आलम याच्यावर दुचाकीचा तांत्रिक बिघाड दुरूस्तीचा दबाव आणला. यावेळी कौसर याने ‘दुकान बंद झाले आहे, गॅरेजचे काम येत नाही, पंक्चर असेल तर काढून देतो...’ असे सांगितले. यावेळी फिर्यादी कौसर व त्याचा भाऊ इस्तेखार अली व त्यांचे मित्र शहाबाज व जहांगीर हे सर्व दुकानाजवळ शु्क्रवारी (दि.२२) रात्री १०वाजेच्या सुमारास जेवण करत होते. तरी फिर्यादीने पंक्चर काढून देण्याची तयारी दर्शविली. मात्र नंबर प्लेट नसलेल्या यामाहा आरएक्स१०० दुचाकीने आलेल्या चौघांनी फिर्यादीसह त्याच्या भावाला व मित्रांवर दगडांनी हल्ला चढविला. लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली.

यावेळी एकाने शहाबाज आलम याच्यावर धारधार चाकूने वार केले. तो जखमी झाल्याचे बघून चौघांनी दुचाकी दुकानाजवळ सोडून पळ काढला होता. यानंतर शहाबाज यास फिर्यादी कौसर व त्याच्या मित्रांनी जवळच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याला गंभीररित्या दुखापत झाली असून त्याच्या शरिरावरील जखमेवर मुंबईनाका येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत पोलिसांनी संशयितांना शिताफीने अटक केली आहे. 

या हल्लेखोरांनी केला होता हल्ला

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार यांच्या आदेशान्वये गुन्हे शोधक पथकाचे प्रभाकर पवार ,सौरभ माळी, प्रकाश नागरे, सागर कातकडे यांनी गोपनीय माहिती काढण्यास सुरूवात केली. मिळालेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचून पोलिसांनी संशयित हल्लेखोर तुषार बेळे (२०,रा. बेळे कॉलनी सिडको), राहुल पालटे (१९,रा.शिवाजी चौक जुने सिडको ), सरफराज शेख ( २०,रा.वसाहत नंबर दोन, लेखा नगर ), राहुल गवारे (२३,रा. हनुमान चौक सिडको) यांना ताब्यात घेतले.

पंक्चर कारागीराचा झाला हाेता खून

आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत तपोवन-टाकळी रिंगरोडवर जेजुरकरमळा रिंगरोडवर अशाचप्रकारे काही महिन्यांपूर्वी  रात्रीच्या सुमारास दुचाकीने आलेल्या हल्लेखोरांनी पंक्चर कारागीरावर कुरापत काढून धारधार शस्त्राने हल्ला केला होता. वर्मी घाव लागल्याने त्या कारागीराचा मृत्यू झाला होता. या खूनाच्या घटनेने परिसरात संताप व्यक्त करण्यात आला होता. रात्रीच्या सुमारास दुचाकींवरून संशयास्पदरित्या वावरणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टारगट तरुणांना गस्तीवरील पोलिसांनी हेरून कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Web Title: In Nashik Knife attack on puncture worker while eating; Shackles to the accused in 5 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.