नवी मुंबई: नेव्हीमध्ये नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक
By नामदेव मोरे | Published: September 13, 2022 06:25 PM2022-09-13T18:25:38+5:302022-09-13T18:26:26+5:30
या विरोधात कामोठे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कामोठेमधील तरूणाला इंडीयन नेव्हीमध्ये नोकरी लावण्याचे अमिष दाखवून ७ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. याप्रकरणी संदीप भांगरे या विरोधात कामोठे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
कामोठेमध्ये राहणारे विशाल पवार यांनी याविषयी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यांचा भाऊ विवेक हा खासगी कंपनीमध्ये व्यवस्थापक पदावर नोकरी करत होता. विशालची डिसेंबर २०२० मध्ये संदीप भांगरे याच्यासोबत ओळख झाली. त्याने आयएनएस शिवाजी लोणावळा येथे नोकरीला असल्याचे सांगितले. तुमच्या भावाला नेव्हीमध्ये नोकरी मिळवून देतो असे अमिष दाखविले. त्याच्यावर भरोवसा ठेवून डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान ७ लाख ३० हजार रूपये त्याला दिले. दरम्यान लॉकडाऊन असल्यामुळे नोकरीसाठी थांबण्यास सांगितले. परंतु नंतर फोन बंद केला.
विशाल यांनी भांगरे याच्या मावळ तालुक्यातील गावी जाऊन चौकशी केली असता त्याने यापुर्वी नोकरीचे अमिष दाखवून अनेकांची फसवणूक केली असल्याचे समजले. त्याच्याविरोधात लोणावळा मध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच विशाल याने मंगळवारी कामोठे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.