PWD विभागात काम करणारा अभियंता निघाला 'धनकुबेर'; ५० लाख रोकड, १७ Plot अन् बरेच काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 11:24 IST2025-02-17T11:23:49+5:302025-02-17T11:24:58+5:30

जयपूरमध्ये १ कोटीहून अधिक किंमतीचे ४ फ्लॅट, उदयपूरमध्ये १.५ कोटी किंमतीचे १० प्लॉट, अजमेरमध्ये लाखो किंमतीचे प्लॉट सापडले आहेत.

In Rajasthan ACB Raid on PWD Engineer Deepak Mittal home; 50 lakhs in cash, 17 plots and much more seized | PWD विभागात काम करणारा अभियंता निघाला 'धनकुबेर'; ५० लाख रोकड, १७ Plot अन् बरेच काही...

PWD विभागात काम करणारा अभियंता निघाला 'धनकुबेर'; ५० लाख रोकड, १७ Plot अन् बरेच काही...

जयपूर - राजस्थानमध्ये लाचलुचपत खात्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा अभियंता दीपक कुमार मित्तल यांच्या घरी धाड टाकली आहे. आतापर्यंतच्या मित्तल यांची संपत्ती पाहून अधिकाऱ्यांचे डोळे दिपले आहेत. मित्तल यांच्या कमाईच्या जवळपास २०५ टक्के अधिक संपत्ती या कारवाईत सापडली आहे. जोधपूर, जयपूर, उदयपूर आणि हरियाणाच्या फरिदाबाद येथे मित्तल यांच्या ६ ठिकाणांवर धाडी टाकून १७ फ्लॅटसह ५० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

लाचलुचपत खात्याला एक गुप्त माहिती मिळाली होती की, दीपक कुमार मित्तल हे उघडपणे लाच घेतात. त्यानंतर लाचलुचपत खात्याने सापळा रचत दीपक कुमार मित्तलविरोधात कारवाई सुरू केली. जेव्हा दीपक कुमार यांच्याकडे ५० लाखांची रोकड लाचच्या माध्यमातून पोहचली आणि पुढच्या २ दिवसांत तो जमिनीत गुंतवणूक करणार आहे अशी माहिती मिळाली तेव्हा ACB विभागाने इंजिनिअरच्या ठिकाणांवर धाड टाकली. दीपक कुमार मित्तल यांच्याकडे आतापर्यंत ५ कोटींहून अधिक संपत्ती असल्याचा खुलासा झाला.

मित्तल यांचे ३ बँक लॉकर्स उघडले आहेत. इतकेच नाही तर नातेवाईकांच्या नावानेही इंजिनिअरने बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप आहे. त्यामुळे मित्तल यांच्या नातेवाईकांचीही चौकशी सुरू आहे. आरोपी इंजिनिअरचा मुलगा उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथं एमबीबीएसचं शिक्षण घेत आहे तर मुलगी राजस्थानच्या चुरू इथं एमडीचं शिक्षण घेत आहे. आरोपी ज्या ज्या शहरात राहत होता तिथे त्याने स्वत:च्या मालकीची संपत्ती बनवली आहे. जयपूरमध्ये १ कोटीहून अधिक किंमतीचे ४ फ्लॅट, उदयपूरमध्ये १.५ कोटी किंमतीचे १० प्लॉट, अजमेरमध्ये लाखो किंमतीचे प्लॉट सापडले आहेत.

दरम्यान, जयपूरच्या बरकत नगर येथे त्यांच्या घरातून ५० लाखांची रोकड, अर्धा किलो सोने, दीड किलो चांदी सापडली आहे. आरोपी अभियंत्याकडे १८ बँक खाती आहेत. त्यात जवळपास ४० लाख रुपये जमा आहेत. मॅच्युअल फंडात ५० लाखांची गुंतवणूक आहे. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर ही गोपनीय कारवाई करण्यात आली. आताही कारवाई सुरू आहे. ज्यात संपत्तीबाबत अधिक माहिती समोर येत आहे. 

Web Title: In Rajasthan ACB Raid on PWD Engineer Deepak Mittal home; 50 lakhs in cash, 17 plots and much more seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.