'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या महिलेवर ४ वर्ष सामूहिक बलात्कार; प्रियकराच्या ३ भावांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 16:46 IST2025-04-04T16:45:44+5:302025-04-04T16:46:11+5:30

या गोष्टी घरात सांगू शकत नसल्याने महिला गप्प बसून राहिली. त्यानंतर तिने प्रियकराचे घर सोडून दिले. आता या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

In Sambhaji Nagar, Woman living in 'live-in' gang-raped for 4 years; 3 brothers of boyfriend charged | 'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या महिलेवर ४ वर्ष सामूहिक बलात्कार; प्रियकराच्या ३ भावांवर आरोप

'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या महिलेवर ४ वर्ष सामूहिक बलात्कार; प्रियकराच्या ३ भावांवर आरोप

छत्रपती संभाजीनगर - पतीपासून वेगळी प्रियकरासोबत राहणाऱ्या ३४ वर्षीय विवाहितेवर चौघांनी ४ वर्ष लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. वाळूज महानगरमध्ये ही घटना घडली असून आरोपींनी महिलेच्या ६ वर्षीय मुलीवरदेखील अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याबाबत वाळूजच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेच्या फिर्यादीत म्हटलंय की, आठवीत असताना २००७ साली शाळेची एक दिवसीय सहल गेली होती. तिथे एका मुलाशी भेट झाली. हळूहळू या भेटीचं रुपांतर प्रेमात झाले. हे प्रेमप्रकरण घरच्यांना समजताच २०१० साली आई वडिलांनी दुसऱ्या युवकासोबत माझे लग्न लावले. नवऱ्यासोबत २-३ राहिल्यानंतर ती २०१२ साली प्रियकरासोबत पळून गेली. त्यानंतर ५-६ वर्ष ती लिव्ह इनमध्ये राहत होती. प्रियकरापासून महिलेला १३ वर्षाचा मुलगा आणि ६ वर्षाची मुलगी आहे. २०२० मध्ये प्रियकराचा मोठा भाऊ घरी आला होता तेव्हा रात्री सर्व झोपलेले असताना त्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. हे प्रियकरालाही माहिती होते. त्या दोघांच्या संगनमताने हे सर्व होत होते असं तिने म्हटलं.

२०२२ साली प्रियकराचा चुलत भाऊ हा घरी मुक्कामी आला असता त्याने प्रियकर घरात असतानाच बळजबरीने संबंध ठेवले मात्र प्रियकर काहीच बोलला नाही. त्यानंतर प्रियकराने महिलेलाच मारहाण केली. या गोष्टी घरात सांगू शकत नसल्याने महिला गप्प बसून राहिली. त्यानंतर तिने प्रियकराचे घर सोडून दिले. आता या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

दरम्यान, १४ मार्च २०२४ ला रांजणगाव येथील रूमवर सायंकाळी ७ वाजता संजयच्या तिसऱ्या भावाने महिलेच्या मुलीचे अंतरवस्त्र काढत तिला धमकी दिली. मला तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवू दे नाहीतर मी तुझ्या मुलीचे जीवन बरबाद करेन तेव्हा नाईलाजाने त्याचे ऐकावे लागले. प्रियकराच्या भावाने जबरदस्तीने अत्याचार केला आणि व्हिडिओ बनवला. संजयसह तिघा भावांनी मिळून महिलेवर ४ वर्ष अत्याचार केले असा आरोप करण्यात आला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: In Sambhaji Nagar, Woman living in 'live-in' gang-raped for 4 years; 3 brothers of boyfriend charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.