मैत्रिणीशी का बोलतो म्हणून मित्रावर कोयत्यानं खुनी हल्ला; रेल्वे स्टेशन परिसरात घडला थरार
By विलास जळकोटकर | Updated: March 26, 2025 17:19 IST2025-03-26T17:19:51+5:302025-03-26T17:19:51+5:30
रेल्वे स्टेशन गँगमन ऑफिसमोरील थरार : आरोपी अटकेत

मैत्रिणीशी का बोलतो म्हणून मित्रावर कोयत्यानं खुनी हल्ला; रेल्वे स्टेशन परिसरात घडला थरार
विलास जळकोटकर
सोलापूर : माझ्या मैत्रिणीशी का बोलतो या कारणावरुन चिडून मित्रानेच मित्रावर कोयत्यानं सपासप डोक्यावर, मानेवर, खांद्यावर, पाठीवर प्राणघातक हल्ला करण्याचा थरार रेल्वे स्टेशनपरिसरातील गँगमन ऑफिसमोर मंगळवारी रात्री १०:३० ते ११:३० या वेळेत घडला.आकाश रंगसिद्ध राऊतराव (रा. फॉरेस्ट रेल्वे लाईन्स, सोलापूर) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी जखमी तरुणाची आई सुरेखा रंगसिद्ध राऊतराव (वय ४५, रा. फॉरेस्ट, सोलापूर) यांनी फिर्याद दिल्याने हल्ला करणाऱ्या शंकर किसन वाडकर (वय ३०, रा. बाळे) याच्याविरुद्ध बीएनएस कलम १०९सह आर्म ॲक्ट ४/२५ अन्वये गुन्हा नोंदला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर बझार पोलिसांनी त्याला तातडीने बुधवारी पहाटे ४:३५ च्या दरम्यान फौजदार नितीन शिंदे यांनी अटक केली. यातील जखमी आकाश याच्या शरीरावर कोयत्यानं सपासप डोक्यासह, मानेवर, खांद्यावर, पाठीवरमानेवर, खांद्यावर, पाठीवर, मानेवर, हातावर अन्यत्र खोलवर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरु आहेत.
या प्रकरणी जखमी आकाशच्या आईने सदर बझार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादीचा मुलगा व संशयित आरोपी शंकर हे दोघे मित्र आहेत. मंगळवारी रात्री साडेदहा ते साडेअकरा या दरम्यान दोघांमध्ये शंकरची मैत्रिण हिच्याशी तू का बोलतो म्हणून दोघांमध्ये भांडण झाले. रागाच्या भरात शंकरने हातातील कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास महिला फौजदार संजीवनी व्हट्टे करीत आहेत.