पत्नीचा मसाज करायला घरी बोलवायचा; मनपा आरोग्य निरीक्षकाने केला महिलेचा विनयभंग

By रूपेश हेळवे | Published: March 15, 2023 03:56 PM2023-03-15T15:56:52+5:302023-03-15T15:57:38+5:30

ही माहिती पीडितेने आपल्या घरी येऊन पतीला सांगितली. त्यानंतर याप्रकरणी पीडितेने याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे

In Solapur Registered Crime Against Municipal health inspector molested a woman | पत्नीचा मसाज करायला घरी बोलवायचा; मनपा आरोग्य निरीक्षकाने केला महिलेचा विनयभंग

पत्नीचा मसाज करायला घरी बोलवायचा; मनपा आरोग्य निरीक्षकाने केला महिलेचा विनयभंग

googlenewsNext

सोलापूर - पत्नीच्या मसाजसाठी महिलेला घरी बोलवून तिच्याशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी मनपा आरोग्य निरीक्षक नागेश धरणे ( रा. उमा नगरी, जुनी मिल कंपाऊंड) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडितेने फिर्याद दिली आहे.

पीडिता ही मसाजचे काम करते. तसेच आरोपी नागेश याची पत्नी ही आजारी असल्याने नागेश हा पीडितेला पत्नीच्या मसाजसाठी घरी बोलवत होता. ११ मार्च रोजीही आरोपी नागेश याने पीडितेला मसाजसाठी घरी बोलवले. पीडिता ही आरोपीच्या घरी गेल्यानंतर मात्र आरोपीची पत्नी तेथे नव्हती. यामुळे पीडितेने तुमची पत्नी कुठे आहे असे विचारल्यानंतर आरोपीने पीडितेशी अश्लील कृत्य केले. ही माहिती पीडितेने आपल्या घरी येऊन पतीला सांगितली. त्यानंतर याप्रकरणी पीडितेने याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपी नागेश धरणे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास जेऊघाले करत आहेत.

Web Title: In Solapur Registered Crime Against Municipal health inspector molested a woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.