कॅनडातून युवतीला बोलावलं, फार्महाऊसमध्ये लपवला मृतदेह; ९ महिन्यांनी झाला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 10:16 AM2023-04-05T10:16:43+5:302023-04-05T10:17:16+5:30
मंगळवारी पोलिसांनी अपहरणानंतर तिची हत्या झाल्याचा खुलासा केला. सध्या पोलीस फार्म हाऊसवर युवतीच्या मृतदेहाचे अवशेष शोधत आहे
सोनीपत - हरियाणाच्या सोनीपत इथं जून २०२२ रोजी एका युवतीची निर्दयी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा गुंता आता पोलिसांनी सोडवला आहे. युवतीच्या प्रियकरानेच तिला गोळी मारून ठार केले त्यानंतर तिचा मृतदेह झंझारा रोडवरील एका फार्म हाऊसमध्ये जमिनीत गाडण्यात आला. मृत युवती ही रोहतकच्या बालंद गावात राहणारी होती. ती कॅनडात राहत होती.
प्रियकर सुनीलने जानेवारी २०२२ मध्ये तिला सोनीपतला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर हत्या करून तिला कायमचे संपवले. मिळालेल्या माहितीनुसार, युवतीच्या तिच्या राहत्या घरी रोहतकला आली होती. त्यानंतर प्रियकराला भेटण्यासाठी ती सोनीपतला गेली. जेव्हा मुलगी घरी परतली नाही तेव्हा २२ जानेवारी २०२२ रोजी कुटुंबाने गन्नोर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. सोनीपतच्या गन्नौर पोलिसांना हे प्रकरण सोडवता आले नाही त्यानंतर भिवानी सीआएकडे तपास सुपूर्द करण्यात आला.
मंगळवारी पोलिसांनी अपहरणानंतर तिची हत्या झाल्याचा खुलासा केला. सध्या पोलीस फार्म हाऊसवर युवतीच्या मृतदेहाचे अवशेष शोधत आहे. काही नमुन तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत. ही मुलगी मावशीकडे राहत होती. त्यावेळी तिची ओळख सुनील नावाच्या युवकाशी झाली. दोघांमध्ये प्रेम झाले. त्यादरम्यान मुलीला तिच्या घरच्यांनी शिक्षणासाठी कॅनडाला पाठवले. पोलिसांनी या प्रकरणात सुनीलला अटक केली. त्याने तपासात युवतीच्या हत्येची कबुली दिली.
दुसरीकडे सोनीपतच्या गावात कुमासपूरजवळ रोडवर सोमवारी दुपारी ट्रक चालकाची गोळी मारून हत्या करण्यात आली. या घटनेची स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात पोस्टमोर्टमसाठी पाठवला.
५ गोळ्या झाडून हत्या
स्थानिक रहिवासी सुमित यांनी सांगितले की, माझा भाऊ अमित उर्फ चिक्कू पायी चालत किशोराच्या दिशेने जात होते. ते ट्रकचालक होते. त्यावेळी दुचाकीवरून स्वार होऊन २ अज्ञात युवक आले आणि त्यांनी ५ गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. घटनेनंतर आरोपी दुचाकीस्वार तिथून पसार झाले. त्याठिकाणाहून जाणाऱ्या लोकांनी मृतदेह पाहून पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांकडून ही माहिती आम्हाला देण्यात आली.