ऑल आऊट ऑपरेशनमध्ये २३९ आरोपींच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 06:57 PM2022-01-29T18:57:22+5:302022-01-29T18:59:35+5:30

Crime News :  गुन्हेगारीला आळा बसण्याकरीता ऑल आऊट ऑपरेशन मोहीम राबविण्यात आली होती. २८ जानेवारी रात्री २ ते शनिवारी दुपारी १ वाजेर्पयत ही मोहीम पोलीस आयुक्तलयात राबविण्यात आली होती.

In the all out operation, the police arrested 239 accused | ऑल आऊट ऑपरेशनमध्ये २३९ आरोपींच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या

ऑल आऊट ऑपरेशनमध्ये २३९ आरोपींच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या

googlenewsNext

ठाणे  : ठाणे पोलीस आयुक्तालयात ठाणे  पोलिसांनी राबविलेल्या ऑल आऊट ऑपरेशन अंतर्गत अवैध्य शस्त्र बाळगणो, दारुबंदी गुन्हे, जुगार प्रतिबंध, अंमली पदार्थ, फरारी आरोपी आणि स्टॅंडींग वॉरन्ट बजावून अटक आदी १६१ गुन्ह्यात हव्या असलेल्या तब्बल २३९ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.


 गुन्हेगारीला आळा बसण्याकरीता ऑल आऊट ऑपरेशन मोहीम राबविण्यात आली होती. २८ जानेवारी रात्री २ ते शनिवारी दुपारी १ वाजेर्पयत ही मोहीम पोलीस आयुक्तलयात राबविण्यात आली होती. त्याअंतर्गत अवैध शस्त्न जप्ती, अग्नीशम्बे जप्ती, फरारी / पाहीजे आरोपात अटक करणो, हॉटेल, लॉजेस, डान्सवार तपासणो, पॅरोल आदेशाचे उल्लंघन केलेल्या आरोपींचा शोध घेणो, वाहने तपासने अभिलेखावरील हिस्ट्रीशीटर व गुड तपासने, स्टॅन्डींग वॉरंटची बजावणी करणो, ऑटोरिक्षा व मद्यप्राशन करून वाहन चालविणान्यावर कारवाई, त्यानुसार झोपडपट्ट्या संवेदनशील ठिकाणो यांची तपासणी करून संशयीत इसमावर प्रतिबंधक कारवाई पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील सराईत गुन्हेगारावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.


दरम्यान पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ठाणो, भिवंडी, कल्याण-डोंबीवली, उल्हासनगर व अंबरनाथ भागात ऑल आऊट मोहीम राबविली. या ऑल आऊट मोहिमेदरम्यान अवैध शस्त्न बाळगणा:या विरोधात १५ कैसेस करण्यात आल्या असून असून १५ आरोपी, स्टेन्डींग वॉरंट बजावून एकुण ०७ आरोपी, १० आरोपींच्या विरोधात हद्दपारीचे आदेश उल्लंघन करून ठाणो पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्ना मिळुन आल्याने त्यांचेवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणो कारवाई करून अटक करण्यात आली आहे दारूबंदी प्रतिबंधक अधिनियम अन्वये ७२ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये ९५ आरोपींना, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये १३ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये ३२ आरोपींना, एन. डी. पी. एस. अॅक्ट अन्वये ४८ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच पाहीजे, फरारी, रेकॉर्ड वरील व पॅरोल रजेवरील फरारी आरोपी यांचा शोध घेवून ३२ जणांना अटक करण्यात आले आहे.


तर ठाणे  शहर वाहतुक शाखा, ठाणो व पोलीस स्टेशन मार्फत नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदयाचे उल्लंघन करणा:या मोटार चालकांविरु ध्द १२९२ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये महाप्राशन करून वाहन चालविणो ८९, गणवेष परिधान न केलेले (अॅटोरिक्षा) ११९ तसेच वाहतुक नियमांचे इतर कलमान्वये १०९२ जणांवर कारवाई करण्यात आल्या आहेत. 

१० गुन्हे शाखे अंतर्गत येणाऱ्या घटका कडुन करण्यात आलेली कारवाई 
हद्दपार इसम १) कल्याणी भिमराव खांडेकर (३९), अब्दुला उर्फ सोनु उथ्थपा उर्फ बकरी पहलवान (३०), मोहम्मद हारूण फारूख कुरेशी (३५) वर्षे यांना ताब्यात घेवून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये कारवाई करण्या करीता आरोपींना संबंधीत पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आलेले आहे. तसेच  ०५ पाहिजे आरोपीना ताब्यात घेवून पुढील कारवाई करीता संबंधीत पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आलेले, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)१३५ अन्वये एकुण २ आरोपीतांना ताब्यात घेवून पुढील कारवाई करीता संबंधीत पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले, मुंबई जुगार अधिनायम कायदयान्वये ०१ गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये ०३ आरोपीतांना ताब्यात घेवून पुढील कारवाई करीता संबंधीत पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे. दारूबंदी अधिनीयम कायदयान्वये ०२ गुन्हे दाखल करून ०२ आरोपींना अटक केली आहे. उल्हासनगर व मुरबाड पोलीस स्टेशन येथील गुन्हा मधील दाखल गुन्हयातील पाहीजे आरोपी अनुक्रमे गुरुसिंग लभाना (३८)  व विजय सपकाळे (२२) यांना संबंधीत पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात येवून गुन्हा उघडकाँस आणला आहे. या ऑल आऊट मोहिमेमध्ये ३३० पोलीस अधिकारी व १६९८ पोलीस अंमलदार इतके मनुष्यबळ वापरण्यात आले.

Web Title: In the all out operation, the police arrested 239 accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.