ज्योती मौर्या प्रकरणी प्रियकरावर टांगती तलवार; धमकी देणे महागात पडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 06:53 AM2023-07-13T06:53:25+5:302023-07-13T06:53:41+5:30

आलोकने ज्योती आणि मनीषविरोधात हत्येचा कट आखत असल्याची तक्रार होमगार्ड संघटनेत केली होती.

In the Jyoti Maurya case, hanging the sword on the lover; Threatening will be expensive | ज्योती मौर्या प्रकरणी प्रियकरावर टांगती तलवार; धमकी देणे महागात पडणार

ज्योती मौर्या प्रकरणी प्रियकरावर टांगती तलवार; धमकी देणे महागात पडणार

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील एसडीएम ज्योती मौर्या आणि पती आलोक यांच्यातील वाद आणि घटस्फोटाच्या प्रकरणात ज्योतीचा प्रियकर होम कमांडंट मनीष दुबेच्या अडचणी वाढल्या आहेत. आलोकला जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल चौकशीअंती मनीषला निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली आहे. 

आलोकने ज्योती आणि मनीषविरोधात हत्येचा कट आखत असल्याची तक्रार होमगार्ड संघटनेत केली होती. तक्रारीसोबत अनेक व्हॉट्सॲप चॅट, कॉल रेकॉर्ड आदी पुरावे म्हणून सादर केले होते. डीजी होमगार्ड, बीके मौर्य यांनी पुढील कारवाईसाठी या प्रकरणाचा तपास अहवाल आपल्या शिफारशींसह राज्य सरकारला पाठवला आहे. विभागाची प्रतिष्ठा मलीन केल्याचा ठपकाही मनीषवर ठेवण्यात आल्याचे समजते. 

हे प्रकरण समोर आल्यावर दुबेची महोबा येथे बदली करण्यात आली होती. तथापि, अमरोहा येथील कार्यकाळात त्याने एका महिला होमगार्डसोबत गैरवर्तन केल्याचा आरोपही चर्चेत आला आहे. चतुर्श श्रेणी कर्मचारी असूनही कर्ज काढून पत्नीला शिकवले, पण अधिकारी बनताच तिचे मनीष दुबेशी अफेअर सुरू झाले आणि मला सोडून गेली, असा आरोप करत आलोकने सोशल मीडियावर काही स्क्रीनशॉट शेअर केल्यापासून या प्रकरणाची सर्वत्र चर्चा आहे. ज्योतीनेही फसवून लग्न व हुंड्याचा आरोप आलोकवर केला आहे.

Web Title: In the Jyoti Maurya case, hanging the sword on the lover; Threatening will be expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.