Crime News: मध्यरात्री सख्या बहिणी काका-पुतण्यासोबत सापडल्या आक्षेपार्ह स्थितीत, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 14:57 IST2022-02-18T14:57:08+5:302022-02-18T14:57:58+5:30
Crime News: उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद जिल्ह्यामध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली असून, संपूर्ण परिसरात या प्रकाराची चर्चा आहे. येथे काका आणि पुतण्याला दोन सख्ख्या बहिणींसोबत मौजमजा करताना रंगेहात पकडण्यात आले.

Crime News: मध्यरात्री सख्या बहिणी काका-पुतण्यासोबत सापडल्या आक्षेपार्ह स्थितीत, त्यानंतर...
उत्तर प्रदेश - उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद जिल्ह्यामध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली असून, संपूर्ण परिसरात या प्रकाराची चर्चा आहे. येथे काका आणि पुतण्याला दोन सख्ख्या बहिणींसोबत मौजमजा करताना रंगेहात पकडण्यात आले. पकडण्यात आल्यानंतर पंचायत बोलावण्यात आली. त्यानंतर पंचायतीच्या निर्णयाच्या आधारावर काका पुतण्याचे त्यांच्या प्रेमिकांसोबत लग्न लावून दिले. दरम्यान, या प्रकरणाची परिसरात चर्चा सुरू आहे.
अमरोहा जिल्ह्यातील सैदनगली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावातील रहिवासी असलेला एक काका आणि पुतण्या पाकबडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाडला गावामध्ये नातेवाईकांकडे आले होते. बुधवारी रात्री दोघेही नातेवाईकांच्या कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणींना भेटण्यासाठी पोहोचले. रात्री सुमारे दोन वाजता नातेवाईंकांना जाग आली तेव्हा दोन्ही तरुण खोलीत नव्हते. त्यानंतर जाऊन पाहिले असता दोघेही वेगवेगळ्या खोलीमध्ये तरुणींसोबत झोपलेले होते. या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर आरडाओरडा करून खोलीचा दरवाजा बंद करण्यात आला. त्यानंतर दोन्ही तरुणांच्या नातेवाईकांना बोलावून घेण्यात आले.
त्यानंतर गावात तातडीने पंचायत बोलावण्यात आली. पंचायतीमध्ये दोन्ही तरुणांना ज्या तरुणींसोबत पकडण्यात आले त्यांच्यासोबत त्यांचा विवाह लावून देण्याचा निर्णय घेण्यात आला. पंचायतीच्या निर्णयानंतर दोघांचाही विवाह तत्काळ उरकण्यात आला. त्यानंतर दोन्ही तरुण आपापल्या पत्नींसह गावाकडे रवाना झाले. काका आणि पुतण्यासोबत लग्न लावून देण्यात आल्याने या सख्ख्या बहिणी एकमेकींच्या सासू आणि सून बनल्या. हा हटके विवाह आता चर्चेचा विषय ठरला आहे.