‘पार्ट टाईम जॉब’च्या नावाखाली साडेअकरा लाखांचा गंडा
By योगेश पांडे | Published: May 21, 2023 03:45 PM2023-05-21T15:45:52+5:302023-05-21T15:46:35+5:30
अम्नानाब्रोलू बिरराधवा (४४, आयकॉन प्लाझा, लक्ष्मीनगर) यांनै १० मे रोजी टेलिग्राम ॲपवरून ‘त्रिलोचना६६६६६’ या युझरनेमवरून मॅसेज आला
योगेश पांडे
नागपूर : ‘पार्ट टाईम जॉब’च्या नावाखाली सुशिक्षितांचा गंडविण्याचे प्रमाण वाढले असून परत एका व्यक्तीची सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केली. विविध टास्क पूर्ण केल्यावर जास्त बोनस मिळण्याचे आमिष दाखवत साडेअकरा लाखांची फसवणूक करण्यात आली.
अम्नानाब्रोलू बिरराधवा (४४, आयकॉन प्लाझा, लक्ष्मीनगर) यांनै १० मे रोजी टेलिग्राम ॲपवरून ‘त्रिलोचना६६६६६’ या युझरनेमवरून मॅसेज आला. त्यात पार्ट टाईम जॉबबाबत माहिती होती. काही टास्क पूर्ण केल्यास बोनस मिळेल असेदेखील त्यात नमूद होते. बिरराधवा यांनी होकार दर्शविला व काही टास्क पूर्ण केले. त्याबदल्यात त्यांना बोनसची रक्कम मिळाली. त्यामुळे त्यांचा विश्वास वाढला व विविध टास्क तसेच बोनसची रक्कम मिळविण्यासाठी आरोपी त्यांच्याकडून पैसे घेत गेले. जास्त नफा होईल या नावाखाली ११.५४ लाख रुपये घेण्यात आले. मात्र त्यांना कुठलीही रक्कम प्रत्यक्षात परत करण्यात आली नाही. तसेच त्यांना परत वारंवार पैशआंची मागणी करण्यात आली. यावरून बिरराधवा यांना संशय आला. त्यांनी चौकशी केली असता फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी सायबर सेलमध्ये तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.