संमोहित करत महिलेनं अल्पवयीन मुलाचं अपहरण केलं; त्यानंतर शारिरीक संबंध बनवले,मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 08:50 AM2022-12-26T08:50:14+5:302022-12-26T08:50:27+5:30
पीडित मुलाला त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले असून आरोपी महिलेला अडीच महिन्यांनी अटक केली आहे.
लखनौ - उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथे एका महिलेने अल्पवयीन मुलासोबत बळजबरीनं लैंगिक संबंध बनवले. या महिलेने मुलाचं अपहरण केले त्यानंतर त्याच्यासोबत संबंध बनवल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या अल्पवयीन मुलाची सुटका करून आरोपी महिलेला अटक केली आहे. तिच्यावर पॉक्सो अंतर्गत तसेच विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची आणखी चौकशी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चित्रकूटच्या राजापूर भागातून महिलेने तिच्या शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाचं आधी अपहरण केले होते. त्यानंतर या अल्पवयीन मुलासोबत जबरदस्तीनं शारिरिक संबंध बनवले. सुरुवातीला मुलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार घेऊन मुलाचे नातेवाईक राजापूर पोलीस ठाण्यात पोहचले तेव्हा पोलिसांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर कुटुंबाने कोर्टाकडे धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर राजापूर पोलिसांनी १ ऑक्टोबर २०२२ रोजी या प्रकरणात गुन्हा नोंदवला.
या प्रकरणाचा तपास करणारे उपनिरिक्षक सूबेदार बिंद यांनी सांगितले की, आम्ही तपासातंर्गत अनेक ठिकाणी छापेमारी केली. त्यावेळी राजापूर पोलिसांना १० ऑक्टोबर २०२२ रोजी अपहरण झालेला मुलगा प्रयागराज जिल्ह्यात सापडला. पोलिसांनी या मुलाची पडताळणी केली तेव्हा तो १७ वर्षांचा असल्याचा आढळला.
संमोहित करून महिला घेऊन गेली - पीडित मुलगा
पोलिसांनी या प्रकरणी कलम ३७६ चाही समावेश केला. महिलेद्वारे लैंगिक शोषणाचा शिकार झालेल्या पीडित मुलाने पोलिसांना सांगितले की, महिलेने मला संमोहित करून तिच्यासोबत घेऊन गेली होती. त्याठिकाणी माझ्यासोबत बळजबरीनं शारिरीक संबंध बनवले. मुलाच्या जबाबानंतर पोलिसांनी महिलेवर कारवाई केली. पीडित मुलाला त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले असून आरोपी महिलेला अडीच महिन्यांनी अटक केली आहे.