पती पत्नींसमोर 'असं' काही बोलला, ते ऐकून २ बायकांनी एकत्रच स्वत:चं आयुष्य संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 12:18 PM2022-09-05T12:18:57+5:302022-09-05T12:20:01+5:30
माझ्या एका पत्नीचं नाव अफसाना आणि दुसरीचं हिना होतं. अफसानासोबत १५ वर्षापूर्वी आणि हिनासोबत ४ वर्षापूर्वी निकाह झाला होता असं पतीने सांगितले.
मुजफ्फरनगर - उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर इथं एका कुटुंबात धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी याठिकाणी एका व्यक्तीच्या दोन बायकांनी स्वत:चा जीव दिला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी पोहचले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आला. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
कोतवालीच्या मिमलाना गावातील ही घटना आहे. ज्याठिकाणी जावेद नावाच्या व्यक्तीच्या २ बायका अफसाना आणि हिना यांनी टोकाचं पाऊल उचललं. या दोघींनी विषारी औषध पिऊन अखेरचा श्वास घेतला. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थली पंचनामा करत पोलिसांनी दोन्ही महिलेचे मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमोर्टमसाठी पाठवले. या २ बायकांचा पती जावेद स्वत: आत्महत्या करणार होता. परंतु त्याआधीच त्याच्या २ पत्नीने आयुष्य संपवलं.
पती जावेद म्हणाला की, मृत महिला या दोघी माझ्या पत्नी होत्या. माझं वाहन पोलिसांनी पकडलं होते. त्याला ७० हजार रुपये चलान भरण्यास सांगितले. त्यातील मी १२ हजार रुपये भरले परंतु बाकी पैसे भरता येत नव्हते. त्यामुळे मी त्रस्त होतो. या नैराश्येत मी पत्नीसमोर अशा आयुष्याचा काय फायदा त्यापेक्षा मी मरण पत्करतो. गाडी सोडवू शकत नाही असं म्हटल्याचं त्याने सांगितले. मात्र माझ्यापूर्वी पत्नीनेच विष पिऊन आत्महत्या केली. माझ्या एका पत्नीचं नाव अफसाना आणि दुसरीचं हिना होतं. अफसानासोबत १५ वर्षापूर्वी आणि हिनासोबत ४ वर्षापूर्वी निकाह झाला होता. आज सकाळी ८.३० च्या सुमारास या दोघींनी विष प्यायलं. माझ्या जेव्हा हे लक्षात आले तात्काळ मी पोलिसांना घटनेबाबत कळवलं. तेव्हा पोलीस घरी आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, जावेदच्या २ पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद सुरू होता. ज्यामुळे दोघींनी विष पिऊन आत्महत्या केली आहे ही आतापर्यंत माहिती समोर आली आहे. सध्या दोघींचे मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले आहेत. याचा रिपोर्ट आल्यानंतर सत्य काय ते उघड होईल. त्याचसोबत सध्या पोलीस विविध अँगलने तपास करत आहेत. लवकरच यावर कार्यवाही केली जाईल अशी माहिती एसपी विजयवर्गीय यांनी दिली आहे.