थरारक! ५ दिवस अल्पवयीन मुलीवर गँगरेप; ५०० रुपये हातात दिले त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 04:48 PM2023-06-12T16:48:47+5:302023-06-12T16:49:36+5:30

शाह आलम नावाच्या आरोपीने विद्यार्थिनीला बहाण्याने त्याच्यासोबत नेले. मुलीला घेऊन तो उत्तराखंडहून काशीपूरला पोहचला

In Uttar Pradesh, 5 days gang rape of bareilly student minor girl | थरारक! ५ दिवस अल्पवयीन मुलीवर गँगरेप; ५०० रुपये हातात दिले त्यानंतर...

थरारक! ५ दिवस अल्पवयीन मुलीवर गँगरेप; ५०० रुपये हातात दिले त्यानंतर...

googlenewsNext

बरेली - उत्तर प्रदेशातील बरेली इथं सामूहिक बलात्काराची एक भयानक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर ५ दिवस बलात्कार करण्यात आला. वेगवेगळ्या मुलांनी मुलीचं लैंगिक शोषण केले. त्यानंतर तिला पैसे देऊन तोंड गप्प ठेवायला सांगितले. या भयंकर घटनेची कहाणी जेव्हा मुलीने पोलिसांसमोर सांगितली तेव्हा त्यांनाही धक्का बसला. 

हे प्रकरण बरेलीच्या मीरगंज पोलीस ठाण्याशी संबंधित आहे. मुलीने हा आरोप तीन मित्रांवर लावण्यात आला आहे. तिला कॉल गर्लसारखे वागवले असा मुलीने आरोप केला. विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितले की, ३ मित्र एक एक करून रोज माझ्यावर लैंगिक अत्याचार करतात. एका कॉल गर्लप्रमाणे तिघांनी माझा वापर केला. त्या तिघांचे मन भरल्यानंतर मला ५०० रुपये दिले आणि कुठेही या प्रकाराची वाच्यता करू नकोस अशी धमकी दिली. 

काय आहे प्रकरण?
पोलिसांच्या माहितीनुसार, शाह आलम नावाच्या आरोपीने विद्यार्थिनीला बहाण्याने त्याच्यासोबत नेले. मुलीला घेऊन तो उत्तराखंडहून काशीपूरला पोहचला. काशीपूर इथं त्याने एक रूम भाड्याने घेतली. त्याठिकाणी मुलीला ५ दिवस ठेवले होते. येथेच या मुलीवर बलात्कार करण्यात आला. त्यानतर तो तिथून निघून गेला. त्यानंतर इरफान उर्फ बाबू तिथे पोहचला. त्यानेही विद्यार्थिनीला धमकी देत तिचे लैंगिक शोषण केले. इरफाननंतर नोएडातील नदीम कुरैशी यानेही तिला हॉटेलमधील रुममध्येच कैद करून ठेवण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर नदीमने ५०० रूपये देऊन विद्यार्थिनीला काशीपूरवरून ट्रेनला बसवले. पोलिसांनी या घटनेत नदीमला ताब्यात घेतले आहे. 

शाह आलम हा विद्यार्थिनीच्या ओळखीतला होता. शाह आलम ६ जूनला काही कामानिमित्त बाहेर चालला होता. तेव्हा गावाबाहेर सोडण्याच्या बहाण्याने मुलीला त्याने कारमध्ये बसवले. त्यानंतर कारमध्येच तो अश्लिल चाळे करू लागला. मुलीने विरोध केल्यानंतर तिला धमकावलं. त्यानंतर बळजबरीने गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. मुलीला जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती एका खोलीत होती. बंद खोलीत शाह आलमसह अन्य २-३ जण होते त्यांनी मुलीवर अत्याचार केले. पोलिसांनी या प्रकरणात मुलीच्या जबाबावरून गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. 

Web Title: In Uttar Pradesh, 5 days gang rape of bareilly student minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.