शाळेत घुसून गावगुंडाची मुख्याध्यापकांना मारहाण; २० सेकंदांत १८ कानशिलात लगावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 12:16 PM2022-03-25T12:16:54+5:302022-03-25T12:24:55+5:30

विद्यार्थ्यांसमोर गुंडाची मुख्याध्यापकांना मारहाण; पोलीस तक्रार दाखल

in uttar pradesh jalaun miscreant entered the school and beats up the headmaster | शाळेत घुसून गावगुंडाची मुख्याध्यापकांना मारहाण; २० सेकंदांत १८ कानशिलात लगावल्या

शाळेत घुसून गावगुंडाची मुख्याध्यापकांना मारहाण; २० सेकंदांत १८ कानशिलात लगावल्या

Next

जालौन: उत्तर प्रदेशातल्या जालौनमध्ये एका प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाला गावगुंडानं मारहाण केली आहे. मुख्याध्यापक मुलांना शिकवत असताना गावगुंड शाळेत घुसला. त्यानं मुख्याध्यापकांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना मारहाण केली. विद्यार्थ्यांच्या समोर गावगुंडानं मुख्याध्यापकांना २० सेकंदांत १८ कानशिलात लगावल्या. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुख्याध्यापकांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. गुंडाला अटक होईपर्यंत शाळा सुरू करणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. जालौनमधल्या नदीगाव येथील जुगराजपुरा गावात हा प्रकार घडला. मुख्याध्यापक राधामोहन विद्यार्थ्यांना शाळेत शिकवत असताना गावातला गुंड कमल जाटव तिथे पोहोचला. त्यानं राधामोहन यांना शिवीगाळ केली. त्यांच्या कानशिलात लगावल्या. 

कमल जाटवनं विद्यार्थ्यांसमोरच राधामोहन यांना मारहाण केली. याची तक्रार राधामोहन यांनी रेंढर पोलीस ठाण्यात दिली. कमल जाटवची पत्नी शाळेत स्वयंपाकाचं काम करते. तिचं मानधन न मिळाल्यानं कमल संतापला होता. त्यामुळे त्यानं राधामोहन यांना मारहाण केल्याचं समजतं. कमलविरोधात कारवाई होईपर्यंत शाळा बंद ठेवणार असल्याचं राधामोहन यांनी सांगितलं.

Web Title: in uttar pradesh jalaun miscreant entered the school and beats up the headmaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.