वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 07:51 IST2025-04-22T07:50:47+5:302025-04-22T07:51:11+5:30

वाल्मीक कराडला ३१ डिसेंबर २०२४ रोजी ताब्यात घेतल्याचा दावा उपअधीक्षक गोल्डे यांचा आहे. परंतु, तेव्हा त्याला खंडणीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले होते. 

In Valmik Karad Jail, the terror of the activists continues; Beed DYSP Golde response creates a stir | वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ

वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ

बीड - वाल्मीक कराड सध्या जेलमध्ये असला तरी त्याच्या कार्यकर्त्यांची दहशत कायम असल्याचे बीडचे उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वांभर गोल्डे यांच्या जबाबातून उघड झाले आहे. कराड हा गुंड असल्याची माहिती असतानाही बीड पोलिस दोन कर्मचारी देऊन त्याला संरक्षण देत होते, हे उघड झाले आहे. गोल्डे यांच्या जबाबामुळे बीड पोलिस नव्या वादात सापडले आहेत. 

सीआयडीचे उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांना गोल्डे यांनी २३ फेब्रुवारी २०२५ रोजी जबाब दिला होता. खंडणीसह देशमुख हत्या प्रकरणात कराडवर गुन्हा दाखल आहे. 

कराडच्या सुरक्षेसाठी बीड पोलिस तैनात
कराडला अटक करून बीड शहर पोलिस ठाण्यातील कोठडीत ठेवले. परंतु, त्याची दहशत असल्याचा दावा करत त्याच्यासह परिसरात १८ अंमलदार आणि दोन आरसीपी प्लाटून बंदोबस्तासाठी ठेवले होते. तसेच २२ जानेवारी रोजीही न्यायालयात हजर करताना ६ अधिकारी, ३३ पुरुष व सहा महिला कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते, असे गोल्डे यांनी म्हटले आहे.

संभ्रम वाढला
९ डिसेंबर २०२४ रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या झाली. याच गुन्ह्यात वाल्मीक कराडला ३१ डिसेंबर २०२४ रोजी ताब्यात घेतल्याचा दावा उपअधीक्षक गोल्डे यांचा आहे. परंतु, तेव्हा त्याला खंडणीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले होते. 

Web Title: In Valmik Karad Jail, the terror of the activists continues; Beed DYSP Golde response creates a stir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.