व्यापाऱ्याच्या घरी आयकर विभागाची धाड; नोटा मोजण्यासाठी मशिन आणावी लागली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 10:11 AM2023-03-22T10:11:09+5:302023-03-22T10:11:29+5:30

नूंह जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई करण्यात आली. या पथकाचे नेतृत्व पुष्पेंद्र पूनिया यांनी केले.

Income tax department raided cattle trader's house at haryana | व्यापाऱ्याच्या घरी आयकर विभागाची धाड; नोटा मोजण्यासाठी मशिन आणावी लागली

व्यापाऱ्याच्या घरी आयकर विभागाची धाड; नोटा मोजण्यासाठी मशिन आणावी लागली

googlenewsNext

नूंह - हरियाणातील नूंह जिल्ह्यातील वार्ड नंबर ६ मध्ये आयकर विभागाने जनावरांचे व्यापारी उमर मोहम्मद पुत्र आसमोहम्मदच्या घरावर सकाळी ७ वाजता छापा मारला. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. आयकर विभागाच्या ८ सदस्यांच्या टीमसह सीआरपीएफ जवानांची एक तुकडीही घटनास्थळी होती. गेल्या अनेक वर्षापासून उमर मोहम्मद हे जनावरांचा व्यापार करतात. त्यांच्याविरोधात कर चोरीचा आरोप झाल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली. 

नूंह जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई करण्यात आली. या पथकाचे नेतृत्व पुष्पेंद्र पूनिया यांनी केले. व्यापारी उमर मोहम्मद मेवात जिल्ह्यासह सर्व मीट फॅक्टरी, उत्तर प्रदेशातील अलीगडसह अन्यठिकाणी जनावारांचा व्यवसाय करतात. गुप्तचर खात्याकडून काही संशयास्पद आर्थिक व्यवहारांबाबत कारवाईचे संकेत देण्यात आले होते. 

नोटा मोजण्यासाठी मशिन बोलावली
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी छापेमारीची पूर्ण तयारी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी उमर मोहम्मद यांच्या घरी धाड टाकली. त्यावेळी शहरात खळबळ माजली. मोहम्मद यांच्या घरी इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडली ही रोकड मोजण्यासाठी मशिन आणावी लागली. या छापेमारीची शहरात जोरदार चर्चा सुरू होती. जनावरांच्या व्यापारी असलेल्या मोहम्मद यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड, दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे सापडली. मोहम्मद यांच्या खात्यातूनही कोट्यवधीची उलाढाल झाली होती. 

Web Title: Income tax department raided cattle trader's house at haryana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.