चिनी कंपन्यांवर आयकर विभागाचे छापे; 1000 कोटींचे हवाला 'घबाड' हाती लागले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 07:44 AM2020-08-12T07:44:53+5:302020-08-12T10:25:23+5:30
शेल कंपन्यांकडून पैशांची अफरातफर होत होती. या रॅकेटमध्ये काही चिनी नागरिक, त्यांचे भारतीय सहकारी आणि बँक कर्मचारीदेखील सहभागी होते.
आयकर विभागाने काही चीनचे नागरिक आणि त्यांच्या भारतीय सहकाऱ्यांवर छापे टाकले आहेत. यामध्ये 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक हवाला व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. गुप्त माहितीनुसार आयकर विभागाने दिल्ली आणि एनसीआर भागात कोणालाही कळू न देता एकाचवेळी छापे टाकले.
शेल कंपन्यांकडून पैशांची अफरातफर होत होती. या रॅकेटमध्ये काही चिनी नागरिक, त्यांचे भारतीय सहकारी आणि बँक कर्मचारीदेखील सहभागी होते. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने मंगळवारी रात्री ही माहिती दिली.
आयकर विभागाने दिल्ली, गाझियाबाद आणि गुरुग्रामच्या 21 ठिकाणांवर छापेमारी केली. सीबीडीटीने कंपन्यांचे नाव उघड केले नसून रक्कम पाहता यामध्ये चीनच्या मोठ्या कंपन्या असण्याची शक्यता आहे. सीबीडीटीने मारलेल्या छाप्यात हवाला व्यवहार आणि पैशांची अफरातफर करण्यात आल्याचे कागदपत्र जप्त केले आहेत.
सुरुवातीला तपासात 300 कोटींच्या हवाला व्य़वहाराचा खुलासा झाला होता. मात्र, हा आकडा 1000 कोटींपेक्षाही जास्त आहे. याचा अर्थ तपासामध्ये आणखी काही मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता आहे. आयकर विभागाच्या चौकशीत असे समोर आले आहे की, चिनी नागरिकांच्या आदेशावर बनावट कंपन्यांचे 40 हून अधिक बँक खाती आहेत. त्यामध्ये 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यात आली होती.
Search action revealed that at the behest of Chinese individuals, more than 40 bank accounts were created in various dummy entities, entering into credits of more than Rs 1,000 crores over the period: CBDT https://t.co/GDa2O4c4Sp
— ANI (@ANI) August 11, 2020
चिनी कंपन्यांच्या सबसिडी मिळालेल्या कंपन्या आणि संबंधित लोकांनी शेल कंपन्यांद्वारे भारतात बनावट व्यवसाय करण्याच्या नावावर जवळपास 100 कोटी रुपये आगाऊ घेतले आहेत. व्यवहारात हाँगकाँग आणि अमेरिकी डॉलरचा समावेश आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Gold Rate Today : सोन्या, चांदीचे दर गडगडले; कोरोना व्हॅक्सिनचा प्रभाव
CoronaVaccine: कोरोना लसीवर रशियाचा शॉर्टकट धोक्याचा; जागतिक तज्ज्ञांचा गंभीर इशारा
पंतप्रधान मोदी लवकरच मोठ्या घोषणा करण्याची शक्यता; हे आहेत अंदाज
खतरनाक Video! WWE मध्ये नव्या सुपरस्टार्सची एन्ट्री; रिंगच तोडल्याने भरली धडकी
चिनी कंपन्यांवर आयकर विभागाचे छापे; 1000 कोटींचे हवाला 'घबाड' हाती लागले
मध्यरात्री पानिपतच्या हायवेवर 'पती, पत्नी और वो'मध्ये धुमशान; दीराच्या मदतीने पकडले
Gold Rate: सोन्याची झळाळी! दिवाळीपर्यंत 70000 वर जाण्याची शक्यता; गुंतवणूक करायची का?
राम मंदिरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले 50 कोटी; जाणून घ्या व्हायरल सत्य