कोरोना काळात तुफान विक्री, डोलो-650 च्या कंपनी, मालकांवर इन्कम टॅक्सचे छापे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 07:51 PM2022-07-06T19:51:10+5:302022-07-06T19:51:37+5:30

छापेमारीवेळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंगळुरूच्या माधवनगरमध्ये रेसकोर्स रोडवर असलेल्या कंपनीच्या कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे तपासली आहेत.

Income Tax Raid search in Dolo-650 manufacturer Micro Lab and oweners in Bengaluru, Goa, new delhi, sikkim offices | कोरोना काळात तुफान विक्री, डोलो-650 च्या कंपनी, मालकांवर इन्कम टॅक्सचे छापे

कोरोना काळात तुफान विक्री, डोलो-650 च्या कंपनी, मालकांवर इन्कम टॅक्सचे छापे

googlenewsNext

कोरोना काळात तुफान विक्री झाल्याने चर्चेत आलेल्या डोलो-650 या गोळीची निर्माता कंपनी आणि मालकांच्या ठिकाण्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. आयकर विभागाच्या जवळपास २० अधिकाऱ्यांनी बंगळुरुच्या माइक्रो लॅब्स लिमिटेडच्या कार्यालयावर छापे टाकले आहेत. 

आयकर विभागाच्या सूत्रांनुसार बुधवारी देशभरातील ४० ठिकाणी आयकर विभागाच्या २०० अधिकाऱ्यांनी छापे मारले आहेत. यामध्ये नवी दिल्ली, सिक्कीम, पंजाब, तामिळनाडू आणि गोवा येथील कार्यालये देखील आहेत. मायक्रो लॅब्सचे मालक सीएमडी दिलीप सुराना आणि संचालक आनंद सुराना यांच्या घरांवरही छापेमारी करण्यात आली आहे. 

छापेमारीवेळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंगळुरूच्या माधवनगरमध्ये रेसकोर्स रोडवर असलेल्या कंपनीच्या कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे तपासली आहेत. कर चोरी प्रकरणी हे छापेमारी करण्यात आली आहे. कंपनीने कोरोना महामारीमध्ये मोठा फायदा मिळविला होता. कंपनीने २०२० मध्ये कोरोना काळात ३५० कोटी रुपयांच्या गोळ्या विकल्या आहेत. याचबरोबर सर्व प्रतिस्पर्दी कंपन्यांना मागे टाकत ४०० कोटींचा महसूल गोळा केला आहे. डोलोने कोरोना काळात एवढी विक्री केली की सर्व रेकॉ़र्ड मोडून टाकले होते. 

यावर कंपनीच्या मालकानी आम्हाला अशी प्रसिद्धी नको होती, असा खुलासा केला होता. जाणकारांनुसार डोलो-650 टॅबलेट बाजारात पॅरासिटेमॉल टॅबलेटचा पर्याय बनला आहे. 
 

Web Title: Income Tax Raid search in Dolo-650 manufacturer Micro Lab and oweners in Bengaluru, Goa, new delhi, sikkim offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.