घड्याळ विक्री करणाऱ्या कंपन्यांवर आयकराचे छापे; रोखीने केली लाखोंच्या घड्याळांची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 12:26 PM2022-11-03T12:26:27+5:302022-11-03T12:30:02+5:30
याचाच तपास विभागाचे अधिकारी करीत आहेत.
मुंबई : महागड्या घड्याळांची विक्री करणाऱ्या दोन कंपन्यांवर बुधवारी आयकर विभागाने छापेमारी केली. या दोन्ही कंपन्यांनी करचोरी केल्याच्या आरोपावरून दिल्लीत ही छापेमारी झाली. या दोन्ही कंपन्यांकडून लाखो रुपये किमतीच्या घड्याळांची विक्री रोखीने झाल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. याचाच तपास विभागाचे अधिकारी करीत आहेत.
या प्रकरणी उपलब्ध माहितीनुसार, रोलेक्स या आंतरराष्ट्रीय घड्याळ ब्रँडची भारतात विक्री करणाऱ्या प्रसिद्ध अशा कपूर वॉच कंपनी आणि जॉन्सन वॉच कंपनी या दोन कंपन्यांवर ही छापेमारी झाल्याचे समजते. मुंबई, दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांतून या कंपन्यांची आलिशान शोरूम्स असून, ही छापेमारी दिल्लीत झाली.
छापेमारीदरम्यान आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही कंपन्यांचे लेखा परीक्षण, ताळेबंद तसेच संगणकीय माहिती ताब्यात घेतली आहे. या कंपन्यांकडून करचोरी करण्यात आल्याचा संशय विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे. या दोन्ही कंपन्यांतर्फे ज्या घड्याळांची विक्री होते, त्या घड्याळांची किंमत काही लाख रुपयांत आहे.