Nupur Sharma : नुपूर शर्मा यांच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलीस ताब्यात घेण्यासाठी पोहोचले दिल्लीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 06:21 PM2022-06-17T18:21:51+5:302022-06-17T18:22:57+5:30

Nupur Sharma :मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पायधुनी पोलिसांचे पथक दिल्लीत पोहोचले आहे. नुपूर शर्मा यांना 25 जून रोजी सकाळी 11 वाजता पायधुनी पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आले आहे

Increase in Nupur Sharma's difficulty; Mumbai police reached Delhi to take him into custody | Nupur Sharma : नुपूर शर्मा यांच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलीस ताब्यात घेण्यासाठी पोहोचले दिल्लीत

Nupur Sharma : नुपूर शर्मा यांच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलीस ताब्यात घेण्यासाठी पोहोचले दिल्लीत

Next

नवी दिल्ली :  प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नुपूर शर्माच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. नुपूर शर्माला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलीस दिल्लीत पोहोचले आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, दिल्ली पोलीस याप्रकरणी मुंबईपोलिसांना मदत करतील, अशी आशा आहे. राज्य पोलिसांचे पथक दिल्लीत उपस्थित असून ते नुपूर शर्माला ताब्यात घेऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पायधुनी पोलिसांचे पथक दिल्लीत पोहोचले आहे. नुपूर शर्मा यांना 25 जून रोजी सकाळी 11 वाजता पायधुनी पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आले आहे. रझा अकादमीच्या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्माविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मुंब्रा आणि ठाण्यातही नुपूर यांच्यावर केस

नुपूर शर्मा यांना मुंब्रा पोलिसांनी समन्स बजावले होते. पोलिसांनी त्यांना 22 जून रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. मुंब्रा येथील मोहम्मद गुफरान खान नावाच्या शिक्षकाने नुपूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याशिवाय ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोलकाता पोलिसांकडूनही समन्स प्राप्त झाले

याशिवाय कोलकाता पोलिसांनी नुपूर शर्मा यांना समन्स बजावले आहे. त्याला 20 जून रोजी नरकेलडांगा पोलिस ठाण्यात हजर राहून जबाब नोंदवण्यास सांगण्यात आले आहे. तृणमूल काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे सरचिटणीस अबुल सोहेल यांनी कोंटाई पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता.

दिल्ली पोलिसांनीही तक्रार दाखल केली

त्याचवेळी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सायबर युनिटने नुपूर शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यांच्याशिवाय नवीन जिंदाल, शादाब चौहान आणि मौलाना मुफ्ती नदीम यांच्यासह नऊ जणांविरुद्ध वातावरण चिघळवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Increase in Nupur Sharma's difficulty; Mumbai police reached Delhi to take him into custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.