स्वातंत्र्य दिनाआधी करणार होते मोठा बॉम्बस्फोट, मानवी बॉम्बच्या माध्यमातून घडवणार होते घातपात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 06:43 PM2021-07-11T18:43:10+5:302021-07-11T19:12:11+5:30
UP Police and ATS Action : या दशतवाद्यांना अमर अल मंदी याने या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलेले होते.
लखनऊच्या काकोरी पोलिस स्टेशन परिसरातील दुबग्गा परिसरात उत्तर प्रदेश एटीएस गेल्या पाच तासांपासून शोधमोहीम राबवित आहे. त्यात एटीएस कमांडोचा समावेश आहे. येथे गॅरेजमध्ये अल कायदाच्या दहशतवाद्यांना लपवल्याबद्दल एटीएसला इनपुट मिळाले होते. त्यानंतरच्या कारवाईत आतापर्यंत दोन दहशतवादी पकडले गेले आहेत. उत्तरप्रदेश पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्थेचे एडीजी प्रशांत कुमार यांनी १५ ऑगस्टच्या आसपास हे दहशतवादी लखनऊमधील गर्दीच्या जागी, बाजारपेठा आणि स्मारकं येथे मानवी बॉम्ब (सुसाईड बॉम्बर) च्या माध्यमातून बॉम्बस्फोट घडवून आणून घातपात करण्याचा कट आखला होता. तसेच शकीलच्या घरातून मोठ्या प्रमाणावर आयईडी जप्त केले असून दहशतवाद्यांकडून पिस्तूल आणि प्रेशर कुकर देखील हस्तगत केला असल्याची माहिती दिली.
एटीएसच्या ताब्यातील दहशतवादी हे अलकायदाशी निगडित अलसार गजवाल उल हिंद या दहशतवादी संस्थेशी जोडलेले असल्याची माहिती प्रशांत कुमार यांनी दिली. मिनहाज अहमद, मासिरुद्दिन उर्फ मुशीर हे दोघे लखनऊचे राहणारे आहेत.
ATS UP has uncovered a big terror module. The team has arrested two terrorists linked with al-Qaeda's Ansar Ghazwat-ul-Hind. Cache of arms, explosive materials recovered: Prashant Kumar, ADG Law and Order, UP, on Lucknow ATS' operation in Kakori today. pic.twitter.com/2kXH4Bok2V
— ANI UP (@ANINewsUP) July 11, 2021
या दशतवाद्यांना अमर अल मंदी याने या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलेले होते. घरात हे दहशतवादी लपून बसून आपला कट रचत होते.याबाबत एटीएसला एका आठवड्यापासून खबर लागली होते. त्यामुळे एक आठवड्यापासून एटीएसची या घरावर नजर होती. दोन - तीन संशयित व्यक्ती या घरात ये- जा करत होते. आज छाप्यादरम्यान ६ ते ७ किलो स्फोटकं जप्त करण्यात आले आहे. या एटीएसच्या मोठ्या कारवाईदरम्यान रायबरेली, सीतामढी आणि रायबरेलीमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.