विंडीज आव्हान देण्यास सक्षम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2018 04:31 AM2018-11-04T04:31:46+5:302018-11-04T05:22:21+5:30
भारत आणि वेस्ट इंडिज संघांदरम्यान कृत्रिम प्रकाशझोतात लढत होत असल्यामुळे मला २५ वर्षांपूर्वीच्या ‘हीरो कप’ स्पर्धेची आठवण झाली. दक्षिण आफ्रिका आणि भारत संघांदरम्यान उपांत्य फेरीच्या लढतीत भारतात प्रथमच फ्लडलाईट आणि रंगीत कपड्यात सामना खेळला गेला.
- सौरव गांगुली
भारत आणि वेस्ट इंडिज संघांदरम्यान कृत्रिम प्रकाशझोतात लढत होत असल्यामुळे मला २५ वर्षांपूर्वीच्या ‘हीरो कप’ स्पर्धेची आठवण झाली. दक्षिण आफ्रिका आणि भारत संघांदरम्यान उपांत्य फेरीच्या लढतीत भारतात प्रथमच फ्लडलाईट आणि रंगीत कपड्यात सामना खेळला गेला. ईडन गार्डनवरही अशा प्रकारचा हा पहिलाच सामना होता. या मैदानावर अंतिम लढतीत भारताने विंडीजचा पराभव केला होता. आता २५ वर्षांनंतर उभय संघांदरम्यान रविवारी टी-२० क्रिकेटची लढत रंगणार आहे.
ईडन गार्डन टी-२० सामन्याचे यजमानपद भूषविण्यासाठी सज्ज आहे. भारताने कसोटी मालिकेत वर्चस्व गाजविल्यानंतर विंडीज संघाने
वन-डे सामन्यांच्या मालिकेत थोडी चांगली कामगिरी केली. त्यांनी
एक लढत टाय केली तर एक
सामना जिंकला. अखेरच्या दोन सामन्यांत मात्र त्याला पराभव स्वीकारावा लागला. अखेरच्या दोन सामन्यात भारताने वर्चस्व गाजवले. टाय लढत आणि त्यानंतरचा पराभव यामुळे भारतीय संघाला इशारा देण्यास पुरेसा ठरला. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्माने पुन्हा एकदा शानदार कामगिरी केली. त्यामुळे त्याला आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघात स्थान मिळाले. आॅस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांचा विचार करता रोहितला पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटमध्ये आपले स्थान पक्के करण्याची संधी आहे.
विराट कोहलीसाठी ही मालिका स्वप्नवत ठरली असून तो हाच फॉर्म आॅस्ट्रेलिया दौऱ्यात कायम राखण्यास उत्सुक असेल. निवड समितीने त्याला आॅस्ट्रेलिया दौºयासाठी फ्रेश ठेवण्यासाठी टी-२० मालिकेत विश्रांती देण्याचा निर्णय घेतला.
कसोटी व वन-डे क्रिकेटच्या तुलनेत विंडीजचा टी-२० संघ चांगला आहे. ईडन गार्डन्सची खेळपट्टी
चांगली आहे. आंद्रे रसेल, किरोन पोलार्ड, डॅरेन ब्राव्हो, शिमरोन हेटमेयर आणि शाई होप यांच्यासारखे
फलंदाज भारतापुढे आव्हान निर्माण करण्यास सक्षम आहेत. याच
मैदानावर त्यांच्या कर्णधाराने टी-२० विश्वकप स्पर्धेच्या अंतिम लढतीत चार षटकार ठोकले होते. टी-२० क्रिकेटमध्ये विंडीज संघ बलाढ्य
आहे, याची भारतीय संघाला
चांगली कल्पना आहे. या मालिकेच्या निमित्ताने युवा रिषभ पंतला चांगली संधी आहे. धोनीला पर्याय शोधणे सोपे नाही. पंत ही जागा भरुन काढण्यात यशस्वी ठरेल, अशी आशा आहे. (गेमप्लॅन)