तटरक्षक दल, गुजरात एटीएसची धडाकेबाज कामगिरी, पाकिस्तानहून अमली पदार्थ घेऊन येणारी बोट उडवली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 10:49 AM2019-03-27T10:49:28+5:302019-03-27T10:51:55+5:30

भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने आज अमली पदार्थांच्या तस्करांविरोधात मोठी कारवाई केली आहे.

Indian Coast Guard & Gujarat ATS Officers has seized approx 100 kg contraband Heroin from Boat | तटरक्षक दल, गुजरात एटीएसची धडाकेबाज कामगिरी, पाकिस्तानहून अमली पदार्थ घेऊन येणारी बोट उडवली

तटरक्षक दल, गुजरात एटीएसची धडाकेबाज कामगिरी, पाकिस्तानहून अमली पदार्थ घेऊन येणारी बोट उडवली

googlenewsNext

पोरबंदर -  भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने आज अमली पदार्थांच्या तस्करांविरोधात मोठी कारवाई केली आहे. सुमारे 100 किलो हेरॉइन घेऊन भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी बोटीला उद्ध्वस्त करत नऊ तस्करांना अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार कोट्यवधीचे अमली पदार्थ घेऊन एक पाकिस्तानी बोट पोरबंदरजवळ भारतीय सागरी हद्दीत धुसली होती. या बोटीबाबत संशय आल्यावर भारतीय  तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने संयुक्त कारवाई करत या बोटीला घेरले. त्यानंतर या बोटीतील नऊ तस्करांना ताब्यात घेण्यात आले. मात्र कारवाई सुरू असताना बोटीत असलेल्या काही जणांनी बोटीला आग लावून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी बोटीमधील हेरॉइनने भरलेल्या चार पिशव्या जप्त करण्यात यश मिळवले. दरम्यान, पाकिस्तानमधून पोरबंदर येथे आणण्यात येत असलेले हे अमली पदार्थ देशभरात पाठवण्यात येणार होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. 



 

Web Title: Indian Coast Guard & Gujarat ATS Officers has seized approx 100 kg contraband Heroin from Boat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.