खळबळजनक! भारतीय नौदलाचा जवानाने आयएनएस बेतवावर केली आत्महत्या
By पूनम अपराज | Published: January 10, 2021 08:21 PM2021-01-10T20:21:03+5:302021-01-10T20:21:45+5:30
Suicide : जहाजावर त्याचा मृतदेह मिळाला, त्याचंशेजारी ती सर्व्हिस रायफल सापडली.
मुंबई - भारतीय नौदलाच्या एका जवानाने आत्महत्या केली आहे. २२ वर्षीय रमेश चौधरी असं या जवानाचं नाव आहे, तो मूळचा जोधपूर गावचा आहे. तो मुंबईमध्ये आयएनएस बेतवावर तैनात होता. रविवारी सकाळी त्याने आपल्या सर्व्हिस रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून घेतली. जहाजावर त्याचा मृतदेह मिळाला, त्याचंशेजारी ती सर्व्हिस रायफल सापडली.
रमेश अविवाहित आणि नुकतीच सुट्टी संपवून तो परत आला होता. त्याच्या कुटुंबात आईवडील आणि बहीण आहे. मुंबई पोलीस नौसेनेसोबत या प्रकारबी तपास करीत आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप उघड झालेले नाही. आयएनएस बेतवा मिसाईल फ्रिगेट श्रेणी नौका आहे. नौकेचे नाव बतवा नदीवरून ठेवले आहे.
A 22-year old Indian Navy sailor posted onboard INS Betwa at Mumbai, was found dead due to a bullet injury in the morning today. His service issue rifle was found next to him. The matter is under investigation by the Police with the assistance of naval authorities.
— ANI (@ANI) January 10, 2021
भारतीय सैन्यात आत्महत्या झाल्याची घटना समोर आल्या आहेत, मात्र नौसेनेत अशा कमी घटना समोर आल्या आहेत. आयएनएस शिवालिकवर देखील २४ वर्षीय जवानाने स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या होत्या.