धारावीत तरुणावर अंदाधुंद गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 12:57 PM2022-02-13T12:57:45+5:302022-02-13T12:58:22+5:30
धारावी परिसरात राहणारा आमिर शुक्रवारी सकाळी नैसर्गिक विधीसाठी येथील पिला बंगलो परिसरालगत असलेल्या मोकळ्या मैदानाकडे गेला.
मुंबई : धारावीमध्ये दिवसाढवळ्या एका आमिर नावाच्या तरुणावर शनिवारी सकाळी दोघांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये तरुण गंभीर जखमी असून, सायन रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्याला चार गोळ्या लागल्या असून, या प्रकरणी धारावी पोलीस तपास करत आहेत.
धारावी परिसरात राहणारा आमिर शुक्रवारी सकाळी नैसर्गिक विधीसाठी येथील पिला बंगलो परिसरालगत असलेल्या मोकळ्या मैदानाकडे गेला. तेथून परतत असताना, तेथे दबा धरून बसलेल्या दुकलीने त्याच्यावर गोळीबार केला. तेथून पळ काढत, तो टॅक्सीच्या दिशेने धावला. मित्राचे लक्ष जाताच, त्याला तत्काळ सायन रुग्णालयात दाखल केले. ड्रग्ज तस्करी विरोधातील भूमिकेमुळे हा गोळीबार झाल्याचे त्याच्या मित्रांचे म्हणणे आहे. याबाबत पोलिसांकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
आरोपींची ओळख पटली -
या प्रकरणातील दोन्ही आरोपींची ओळख पटली असून, त्यानुसार त्यांचा शोध सुरू आहे. लवकरच दोघांना अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पूर्ववैमनस्यांतून गोळीबार करण्यात आला आहे. जखमी, तसेच अटक आरोपी स्थानिक गुंड आहेत. त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत.