वकील आहे सांगून केली 5 लग्न, महिलांना ओढायचा जाळ्यात; अखेर 'असा' झाला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 05:20 PM2023-07-04T17:20:59+5:302023-07-04T17:21:47+5:30

एक-दोन नव्हे तर 5 महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं. अत्याचाराला बळी पडलेल्या 3 महिलांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

indore devil advocate married five even neighbor was not spared from glamorous look | वकील आहे सांगून केली 5 लग्न, महिलांना ओढायचा जाळ्यात; अखेर 'असा' झाला पर्दाफाश

फोटो - NBT

googlenewsNext

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका व्यक्तीने असा पराक्रम केला आहे, ज्याबद्दल समजल्यावर धक्काच बसेल. त्याने एक-दोन नव्हे तर 5 महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं. अत्याचाराला बळी पडलेल्या 3 महिलांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने 3 महिलांना घटस्फोटही दिला आहे, असा आरोप पीडितेने न्यायालयासमोर केला आहे. आरोपी दिल्ली, पुणे आणि इंदूर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. 39 वर्षीय आरोपी ललित परमार सध्या तुरुंगात आहे.

एडवोकेट कृष्ण कुमार कुन्हारे यांनी सांगितले की, 11 जून 2023 रोजी 27 वर्षीय पीडितेने ललित परमार विरोधात लासुडिया पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. आरोपी दोन वर्षांपासून तिच्या संपर्कात होता, असे तक्रारीत म्हटले आहे. शेजारी राहत असल्याने तिची ओळख झाली. ललितने स्वत:ची ओळख वकील म्हणून करून दिली आणि पतीला जामीन मिळण्यास मदत करू शकतो, असे सांगितले. यामुळे तो पीडितेच्या घरी येऊ लागला. आरोपीने फसवणूक करून पीडितेशी संबंध ठेवले. पीडितेच्या पतीला काही महिन्यांपूर्वी जामीन मिळाला होता. 

ललितने यानंतरही तिच्यावर फेसबुक आणि इतर सोशल साइट्सवर बोलण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. पीडितेने हा प्रकार पतीला सांगितला. ललितची माहिती काढली असता तो वकील नसल्याचे आढळून आले. पीडितेच्या पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र, 20 जून रोजी त्यांना जामीनही मिळाला. दरम्यान, दिल्लीतील एका महिलेने त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला. यावेळी पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द केला. 

दिल्लीतील महिलेने कोर्टात सांगितले की, आरोपी ललितसोबत तिची ओळख डेटिंग अॅपद्वारे झाली. 2022 मध्ये ती ललितला भेटण्यासाठी इंदूरला आली होती. यादरम्यान आरोपी तिला त्याच्या मित्राच्या फ्लॅटवर घेऊन गेला. यादरम्यान त्याने महिलेवर संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. त्यानंतर काही दिवस ललित कामाच्या बहाण्याने दिल्लीला पोहोचला. ३ महिने तो महिलेसोबत दिल्लीत राहिला. त्यानंतर 2023 मध्ये महिलेला ललितच्या फसवणुकीची माहिती मिळाली. 

महिलेने ललितची हिस्ट्री तपासली असता त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याचे आढळून आले. त्याचवेळी दुसऱ्या पत्नीपासून घटस्फोटाचे प्रकरण सुरू होते. ललितचे अनेक महिलांशी संबंध असल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्याने सर्वांची फसवणूक केली आहे. महिलेने आपल्या वकिलामार्फत न्यायालयात आरोपीविरुद्ध पुरावेही सादर केले. मिळालेल्या माहितीनुसार, ललित परमार हा बी.कॉम पास आहे. त्याचे वडील दुकान चालवतात. पूर्वी एका खासगी कंपनीत काम केले. 2013 मध्ये त्यांनी पहिले लग्न केले. लग्नानंतर काही काळानंतर त्यांची बदली पुण्याला झाली.

येथे तो दुसऱ्या महिलेसोबत लिव्ह इनमध्ये राहू लागला. यादरम्यान दुसरी महिला गरोदर राहिली. त्यानंतर त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन दुसरे लग्न केले. त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका महिलेशी त्याची मैत्री झाली. त्यानंतर त्याने दुसऱ्या पत्नीलाही घटस्फोट दिला. लग्न आणि घटस्फोटाची बाब त्याने आपल्या नवीन मैत्रिणींपासून लपवून ठेवली. त्यानंतर पीडितेने त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. एवढच नाही तर स्वत: वकील असल्याचं सांगून आरोपीने शेजारी राहणाऱ्या महिलेलाही जाळ्यात ओढलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: indore devil advocate married five even neighbor was not spared from glamorous look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.