आठवड्याभरात इंद्राणी मुखर्जी दुसऱ्यांदा जे. जे. रुग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 09:30 PM2018-09-28T21:30:54+5:302018-09-28T21:31:37+5:30
डोकेदुखी आणि रक्तदाब कमी झाल्याची तक्रार मुखर्जीने कारागृह प्रशासनाकडे केली.
मुंबई - भायखळ्याच्या महिला कारागृहात शीना बोरा हत्याप्रकरणात मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला पुन्हा आज जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोकेदुखी आणि रक्तदाब कमी झाल्याची तक्रार मुखर्जीने कारागृह प्रशासनाकडे केली.
चार दिवसांपूर्वीच डोकेदुखी आणि रक्तदाबाचा तत्रास झाला होता. त्यावर उपचार घेऊन तिला कारागृहात सोडण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी मध्यरात्री पुन्हा त्रास होऊ लागला. हायपरटेंशनचाही आजार असल्याने मध्यरात्री रुग्णालयात दाखल केल्यानंतर अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. सकाळी मेडिसीन विभागाचे प्रमुख डाॅ. वकार शेख यांनी तिची तपासणी केली. सायंकाळनंतर प्रकृती स्थिरावली. परंतु रक्तदाब कमीच असल्याने इंद्राणीवर डाॅक्टरांचे पथक लक्ष ठेवून असल्याचे रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ संजय सुरासे यांनी सांगितले. सर्व तपासणीचे नमुने सकारात्मक आले तर उद्या इंद्राणी यांना डिस्चार्ज दिला जाईल, असेही डाॅ. सुरासे म्हणाले.