कुख्यात गुंड एजाज लकडावालाचा साथीदार महाराजला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 21:35 IST2020-01-28T21:31:29+5:302020-01-28T21:35:19+5:30
पोलिसांनी चौकशीसाठी त्याला डोंगरी येथील त्याच्या राहत्या घरी नेले होेते.

कुख्यात गुंड एजाज लकडावालाचा साथीदार महाराजला बेड्या
मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक कुख्यात गुंड एजाज लकडावालाचा साथीदार सलीम मेनन उर्फ महाराज याला मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाच्यापोलिसांनी अटक केली आहे. अंडरवर्ल्डमध्ये सलीम हा महाराज या नावाने ओळखला जात होता. खंडणी प्रकरणात महाराजचे नाव देखील सामील असल्याने खंडणी विरोधी पथकाच्यापोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी चौकशीसाठी त्याला डोंगरी येथील त्याच्या राहत्या घरी नेले होेते.
एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांनी पाटणा विमानतळावरुन नुकतीच अटक केली आहे. सध्या तो पोलीस कोठडी आहे. मुंबई पोलिसांच्या वॉण्टेड यादीत एजाज लकडावाला होता. ३७ गुन्ह्यांच्या प्रकरणात एजाज लकडावाला गुन्हेगार आहे. यामध्ये हत्या, खंडणी सारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. नुकत्याच एका प्रकरणात लकडावालासह महाराज ही सहभागी असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली आहे. महाराजच्या घराची ही पोलिसांनी झडती घेतली असून त्याला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. महाराज विरोधात पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३८४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुंबई - कुख्यात गुंड एजाज लकडावालाचा साथीदार महाराजला बेड्या https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) January 28, 2020
याअगोदर मुंबई विमानतळावर एजाज लकडावालाच्या मुलीला अटक करण्यात आली आहे. सोनिया मनीष अडवाणी या नावाने बनावट पासपोर्टच्या आधारे ती देशाबाहेर पळून जात होती. तिची चौकशी केली असता त्यावेळी एजाज लकडावालासंबंधी माहिती उघडकीस आली होती. बिहार पोलिसांच्या टीमची मदत घेऊन पाटणा विमानतळावर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. ८ जानेवारीला रात्री ९ वाजता एजाज लकडावालाला अटक करण्यात आली होती.