डॉमिनोजच्या ऑर्डर्सची माहिती लीक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 09:57 AM2021-05-24T09:57:32+5:302021-05-24T09:58:03+5:30
लोकप्रिय पिझ्झा ब्रँड असलेल्या “डॉमिनोज”ला हॅकर्सने पुन्हा एकदा झटका दिला आहे. कंपनीच्या १८ कोटी ऑर्डर्सची माहिती हॅक करण्यात आली असून ती डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.
नवी दिल्ली : लोकप्रिय पिझ्झा ब्रँड असलेल्या “डॉमिनोज”ला हॅकर्सने पुन्हा एकदा झटका दिला आहे. कंपनीच्या १८ कोटी ऑर्डर्सची माहिती हॅक करण्यात आली असून ती डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.
हॅकरने एप्रिलमध्ये हा कारनामा केला होता. त्याने कंपनीच्या सर्व्हर्सपर्यंत पोहोचल्याचा दावा केला होता. सुमारे १३ टीबी एवढी माहिती त्याने हॅक केली आहे. या माहितीमध्ये १८ कोटी ऑर्डर्सची सविस्तर माहिती आहे. त्यात ग्राहकांची नावे, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, पेमेंटची माहिती तसेच क्रेडिट कार्ड क्रमांक इत्यादी माहितीचाही समावेश असल्याचा संशय आहे. डॉमिनोजने मात्र आर्थिक माहिती लीक झाल्याचे फेटाळले होते.
सर्च इंजिनबाबत हॅकर्सचा प्रयत्न
एप्रिलमध्येही असाच प्रकार उघडकीस आला होता. ग्राहकांची माहिती मोठी रक्कम मोजून विकण्यात आली होती. सुमारे १० लाख क्रेडिट कार्ड्सची माहिती हॅक करण्यात आली होती. ही माहिती सर्च इंजिनवर उपलब्ध करण्यासाठी हॅकर्सचे प्रयत्न सुरू असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.