इन्फोसिस कंपनीच्या एम्प्लॉयी केअर सेंटरमध्ये अभियंत्याने घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 09:59 PM2021-02-13T21:59:31+5:302021-02-13T22:00:55+5:30

crime news: राठोड याचे मित्र, कंपनीतील डॉक्टर व कर्मचारी यांच्या मदतीने पोलिसांनी राठोड याला बेशुद्धावस्थेत खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.

Infosys' Employee suicide in company's Care Center of pune | इन्फोसिस कंपनीच्या एम्प्लॉयी केअर सेंटरमध्ये अभियंत्याने घेतला गळफास

इन्फोसिस कंपनीच्या एम्प्लॉयी केअर सेंटरमध्ये अभियंत्याने घेतला गळफास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : इन्फोसिस कंपनीच्या अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हिंजवडी आयटी पार्क फेज दोन येथे इन्फोसिस कंपनीच्या एम्प्लॉय केअर सेंटरमधील बाथरूममध्ये हा प्रकार उघडकीस आला. (Infosys' Employee suicide at hinjawadi park)

रणजितसिंग किसनसिंग राठोड (वय २२), असे आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. कर्नल योगेश बाळकृष्ण जोशी (रा. औंध) यांनी खबर दिल्यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभियंता असलेला रणजितसिंग राठोड हा इन्फोसिस कंपनीत नोकरीला होता. कंपनीच्या एम्प्लॉय केअर सेंटरमध्ये तो राहायला होता.

गुरुवारी (दि. ११) त्याने तेथील बाथरुममध्ये टाॅवेलच्या साह्याने गळफास घेतला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर कर्नल जोशी यांनी पोलिसांना खबर दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. राठोड याचे मित्र, कंपनीतील डॉक्टर व कर्मचारी यांच्या मदतीने पोलिसांनी राठोड याला बेशुद्धावस्थेत खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक पंडित अहिरे तपास करीत आहेत.

Web Title: Infosys' Employee suicide in company's Care Center of pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.