अमानवीय कृत्य! कर्जाच्या हप्त्यासाठी कर्जदाराला डांबून ठेवले, सिगारेटचे चटके दिले

By अनिल गवई | Published: October 27, 2022 01:29 PM2022-10-27T13:29:50+5:302022-10-27T13:31:16+5:30

वंचितच्या शहराध्यक्षासह चौघाविरोधात गुन्हा दाखल. तीन दिवस दारू पिऊन या कर्जदाराचे हातपाय बांधून अत्याचार केले.

Inhuman act! Borrower was held up for loan installments, cigarettes bloom were given, beaten | अमानवीय कृत्य! कर्जाच्या हप्त्यासाठी कर्जदाराला डांबून ठेवले, सिगारेटचे चटके दिले

अमानवीय कृत्य! कर्जाच्या हप्त्यासाठी कर्जदाराला डांबून ठेवले, सिगारेटचे चटके दिले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: सलग तीन-चार महिने कर्जाचे हप्ते थकविल्याने एका खासगी कंपनीच्या कर्जवसुलीदारांनी कर्जदारास तीन दिवस डांबून ठेवत सिगारेटचे चटके दिले. सोबतच अमानविय कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिडीत कर्जदाराच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीसांनी वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्षांसह चौघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केल्याने शेगाव शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.

शेगाव येथील अशफाक खान मेहता (३२) यांनी शेगाव पोलीसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, त्यांनी कॅपिटल नामक खासगी कंपनीकडून प्रवासी मालवाहतुकीसाठी कर्ज घेतले. दरम्यान वाहनाचा व्यवसाय मंदित आल्याने, कर्ज घेऊन घेतलेले वाहन अकोला येथील एका व्यक्तीला विकले. या व्यवहारापोटी कायदेशीर रित्या त्याकडून नोटरी करून घेऊन कजार्ची रक्कम तो फेडेल असा करारनामा केला. मात्र, सदर कर्जदाराने फायनान्स कंपनीकडे रक्कम भरली नसल्याने रविवारी खामगाव येथील चार जणांनी शेगावात येऊन कर्जदार अशफाक खान याला रेल्वे स्टेशन जवळ थांबवून त्याचे अपहरण करीत स्थानिक विश्रामभनात नेले. तेथे रात्री उशिरापर्यंत बेदमपणे मारहाण केली. यानंतर सदर कर्जदाराला मोटरसायकल वर बसवून खामगाव शहरातील शंकर नगर भागातील एका घरात नेऊन तिथे दाबून ठेवले यानंतर चौघांनी सदर कर्जदाराला बेदमपणे मारहाण करीत संपूर्ण शरीरावर सिगारेटचे चटके दिले.

हा अत्याचार त्यांचा दिवसभर चालला सतत तीन दिवस दारू पिऊन या कर्जदाराचे हातपाय बांधून अत्याचार केले.  इतकेच नव्हे तर कर्जदाराकडून दोन चेकवर स्वत:च्या हस्ताक्षरात शहरात सात लाखांच्या रकमाही टाकून घेऊन व्हिडिओ बनवण्यात असल्याचे  अशफाक खान यांचे म्हणणे आहे. त्यानंतर  गाडी परत आणून देतो, या आश्वासनानंतर गंभीर जखमी असलेल्या अश्फाक खानला खामगावच्या बस स्थानकावर शंभर रुपये देऊन सोडून देण्यात आले. अशपाक खान याने शेगाव गाठल्यानंतर मंगळवारी रात्री सर्व हकीकत आपल्या नातेवाईकांना सांगितली. यानंतर बुधवारी शहर पोलिसात रितसर तक्रार नोंदविण्यात आली.  यात आरोपी विजय काळे रा. शंकर नगर खामगांव,  मंगेश तायडे रा. गोंधनापूर प्रवीण बोदडे राहणार शेगाव आणि आणखी एका अनोळखी इसमांविरुद्ध अपहरणासह भादंवि कलम ३६५, ३२४, ३२३, ३४३, ५०६, ३४, ५०४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे

शेगावातून अपहरण; खामगावात दिले चटके!
- वाहनासाठी घेतलेल्या कर्जापोटी हप्ते थकल्यामुळे कर्जदाराचे शेगावात अपहरण करण्यात आले. त्यानंतर खामगावातील शंकर नगरातील एका खोलीत डांबून ठेवत सिगारेटचे चटके देण्यात आल्याचे कर्जदाराने तक्रारीत नमुद केले आहे.

कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर!
- तडीपारीसह विविध कलमान्वये तीन-चार गुन्हे दाखल असलेल्या एका आरोपीचा गुन्ह्यात समावेश आहे. अशातच गत काही दिवसांपासून घडणाºया घटनांमुळे शेगावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.

Web Title: Inhuman act! Borrower was held up for loan installments, cigarettes bloom were given, beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.