अंबरनाथमध्ये दोन अल्पवयीन मुलांना नग्न करून केली अमानुष मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 01:18 AM2021-02-21T01:18:39+5:302021-02-21T01:18:49+5:30

लाथा-बुक्क्या, काठीने या मुलांच्या पायावर, हातावर, डोक्यात, पोटात, इतकेच नव्हे, तर गुप्तांगावरही मारहाण करण्यात आली. 

Inhuman beating of two minors by stripping them naked in Ambernath | अंबरनाथमध्ये दोन अल्पवयीन मुलांना नग्न करून केली अमानुष मारहाण

अंबरनाथमध्ये दोन अल्पवयीन मुलांना नग्न करून केली अमानुष मारहाण

googlenewsNext

अंबरनाथ : अवघ्या १२ ते १३ वर्षांच्या दोन लहान मुलांना नग्न करून अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना अंबरनाथमध्ये घडली. या प्रकाराचा व्हिडीओ आता उघड झाला असून, या प्रकारामुळे अंबरनाथ शहरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत.

अंबरनाथच्या पश्चिम भागातील चिंचपाडा खदान परिसरात हा संतापजनक प्रकार घडला. बाबू गुंडे ऊर्फ खोपडी या विक्षिप्त व्यक्तीने मुलींची छेड काढण्याच्या संशयावरून तीन लहान मुलांना नग्न करून मारहाण केली. तसेच त्यांना नग्नावस्थेत परिसरातून चालत घरी पाठवले. यातल्या एका लहान मुलाला तर त्याने काठीने अमानुष मारहाण केली. 

लाथा-बुक्क्या, काठीने या मुलांच्या पायावर, हातावर, डोक्यात, पोटात, इतकेच नव्हे, तर गुप्तांगावरही मारहाण करण्यात आली. 
यावेळी हा मुलगा गयावया करत मारू नका, अशी विनवणी करत होता. तर बाबू याचा एक साथीदार मात्र या सगळ्याचं चित्रीकरण करत होता. बाबू याने इतक्यावरच न थांबता या मुलाला कपडे काढायला लावत नग्न अवस्थेत तो राहत असलेल्या परिसरापर्यंत चालवत नेले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अंबरनाथ शहरात संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत.
 

Web Title: Inhuman beating of two minors by stripping them naked in Ambernath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.