Video : वयोवृद्ध दांपत्यास अमानुष मारहाण; घटनेचा सर्वत्र केला जात आहे निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 07:46 PM2021-07-30T19:46:40+5:302021-07-30T19:47:35+5:30

Assaulting Case : मिळालेल्या माहितीनुसार, बोईसर आगाराची एम एच 20 बीएल 2738 या क्रमांकाची एसटी बस बोईसरवरून पैठणला जात होती.

Inhumane beatings of elderly couple; The incident is being protested everywhere | Video : वयोवृद्ध दांपत्यास अमानुष मारहाण; घटनेचा सर्वत्र केला जात आहे निषेध

Video : वयोवृद्ध दांपत्यास अमानुष मारहाण; घटनेचा सर्वत्र केला जात आहे निषेध

Next
ठळक मुद्देबसचालक गोरखनाथ नागरगुजे व वाहक शितल पवार अशी वयोवृद्ध दांपत्यास मारहाण केलेल्यांची नावे आहेत. 

पालघर- गाडी सावकाश चालवा असे सांगितल्याचा राग मनात धरून एका वयोवृद्ध दांपत्यास बस चालक व महिला वाहकाने अमानुष मारहाण केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास वाडा बसस्थानकात घडली.दरम्यान, या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात असून बस चालक व महिला वाहकाला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. बसचालक गोरखनाथ नागरगुजे व वाहक शितल पवार अशी वयोवृद्ध दांपत्यास मारहाण केलेल्यांची नावे आहेत. 

       

मिळालेल्या माहितीनुसार, बोईसर आगाराची एम एच 20 बीएल 2738 या क्रमांकाची एसटी बस बोईसरवरून पैठणला जात होती. मनोर सोडून पुढे हमरापूर फाट्यावर आल्यावर येथे जर्नादन सदू पाटील वय 65 व त्यांची पत्नी सुमन पाटील हे वयोवृद्ध दांपत्य बसमध्ये बसले.चालक बस जोरात चालवत असल्याने बसचालकाला बस सावकाश चालवा असे वयोवृद्ध इसमाने त्यांना सांगितले. त्यावरून बसमध्ये चालक वाहक व जर्नादन यांची बोलाचाली झाली. त्यानंतर वाडा बसस्थानकात बस आल्यानंतर तिथे हे दांपत्य बसमधून उतरले.त्यानंतर वाहक व चालकांनी त्यांना अमानुष पणे मारहाण केली. स्थानकातील इतर प्रवासी भांडण सोडवण्याचा प्रयत्न करीत होते मात्र तरीही चालक वाहक ऐकत नसल्याचे चित्रफितीवरून दिसून येत आहे. दरम्यान घटनेची चित्रफित सोशल मिडियावर व्हायरल होताच व वयाचा विचार न करता मारहाण केल्याने या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात असून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 

यासंदर्भात बोईसर आगाराचे आगारप्रमुख राजू पाटील यांच्याशी संपर्क साधला असता विभागीय वाहतूक अधिकारी आशिष चौधरी यांनी बसचालक गोरखनाथ नागरगुजे व वाहक शितल पवार यांना निलंबित केले असल्याची माहिती मिळाली आहे. 

 

Web Title: Inhumane beatings of elderly couple; The incident is being protested everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.