खळबळ! आर्थर रोड तुरुंगात कैद्याची आत्महत्या; मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात झाली होती अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 21:52 IST2022-01-20T21:50:08+5:302022-01-20T21:52:18+5:30
Inmate commits suicide at Arthur Road jail : मोहम्मद हनीफ इक्बाल हानिफ शेख असे क़ैदयाचे नाव असून, याप्रकरणी एन. एम जोशी मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.

खळबळ! आर्थर रोड तुरुंगात कैद्याची आत्महत्या; मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात झाली होती अटक
मुंबई : मोबाईल चोरीच्या गुह्यांत आर्थर रोड कारागृहात असलेल्या एका क़ैदयाने कारागृहातील बाथरूममध्ये गळफ़ास घेत आयुष्य संपविल्याने खळबळ उडाली आहे. मोहम्मद हनीफ इक्बाल हानिफ शेख असे क़ैदयाचे नाव असून, याप्रकरणी एन. एम जोशी मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.
जे जे मार्ग पोलिसांनी शेखला चोरीच्या गुह्यांत अटक केली होती. गुरूवारी सकाळी कारागृहातील बाथरूममध्ये चादरीच्या सहाय्याने तो गळफ़ास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. अन्य कैदयांकड़ून याबाबत माहिती मिळताच शेखला तात्काळ जे जे रुग्णालयात नेले. तेथे त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले आहे.
आर्थर रोड तुरुंगात कैद्याची आत्महत्या; मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात झाली होती अटक pic.twitter.com/ThRQsKSPzG
— Lokmat (@lokmat) January 20, 2022
घटनेची वर्दी लागताच एन एम जोशी मार्ग पोलीस तेथे दाखल झाले. याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेखच्या मृत्यूबाबत प्राथमिक तपासात काहीही संशयास्पद आढळून आलेले नसून अधिक तपास सुरु असल्याचे एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेश केवळे यांनी सांगितले. तणावातून त्याने टोकाचे पाऊल उकलले आहे. मात्र आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.