'बाबा आईचा दोरीने गळा आवळून पळाले', ५ वर्षाच्या निष्पाप मुलाने पोलिसांना सांगितली हकीकत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 09:50 PM2021-12-26T21:50:40+5:302021-12-26T21:53:08+5:30

Murder Case : घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने तपास सुरू केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पोलिसांसोबतच मारेकरी पतीचाही शोध सुरू आहे.

Innocent 5-year-old boy tells police fact, wife illicit relation strangulation by husband | 'बाबा आईचा दोरीने गळा आवळून पळाले', ५ वर्षाच्या निष्पाप मुलाने पोलिसांना सांगितली हकीकत

'बाबा आईचा दोरीने गळा आवळून पळाले', ५ वर्षाच्या निष्पाप मुलाने पोलिसांना सांगितली हकीकत

Next

कानपूरमधून एका खुनाची घटना समोर आली आहे. जिथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केली. खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. या व्यक्तीने आपल्या 5 वर्षांच्या निष्पाप मुलीसमोर ही हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांची दुरावस्था झाली आहे. आरोपीच्या शोधात पोलीस ठिकठिकाणी छापे टाकत आहेत.

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या

हे प्रकरण नौबस्ता पोलीस स्टेशन हद्दीतील राजीव नगर भागातील आहे. जिथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीचा 5 वर्षांच्या निष्पाप मुलीसमोर गळा आवळून खून केला आणि घटनास्थळावरून फरार झाला. दोघांमध्ये वारंवार भांडणे होत असल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. दोघांनाही अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची हाणामारी काही थांबली नाही.

५ वर्षाच्या मुलीच्या समोरच खून

5 वर्षीय निष्पाप मुलीने पोलिसांना सांगितले की, काल (शनिवारी) वडील आणि आईमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर वडिलांनी दोरीने आईचा गळा आवळून पळ काढला. त्याचवेळी हत्येचे वृत्त पसरताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने तपास सुरू केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पोलिसांसोबतच मारेकरी पतीचाही शोध सुरू आहे.

पोलीस आरोपीच्या शोधात

याप्रकरणी पोलिसांचे म्हणणे आहे की, अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्या व्यक्तीने पत्नीचा गळा दाबून खून केला. आरोपीचा शोध सुरू असून, त्याला लवकरच अटक करण्यात येईल. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.पोलिसांचे म्हणणे आहे की, हे कुटुंब भाड्याच्या घरात राहते, त्यांना दोन मुले आहेत.

Web Title: Innocent 5-year-old boy tells police fact, wife illicit relation strangulation by husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.