पालघरमधील नागझरीत सापडली स्फोटके; २०१ जिलेटीनच्या कांड्या जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 09:15 PM2018-10-09T21:15:55+5:302018-10-09T21:16:25+5:30
याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलमी २८६ आणि भारताचा स्फोटकांचा कायदा १८८४ च्या कलम ९ (ब), १ (ब) आणि स्फोटक पदार्थ विषयक कायदा १९०८ चे कलम ५ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालघर - पालघर जिल्ह्यातील नागझरी तालुक्यातील एका दुकानातुन स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलमी २८६ आणि भारताचा स्फोटकांचा कायदा १८८४ च्या कलम ९ (ब), १ (ब) आणि स्फोटक पदार्थ विषयक कायदा १९०८ चे कलम ५ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुकानातून २०१ जिलेटीनच्या सफेद कांड्या (किंमत २२००००), १३८६०० किंमतीच्या १२६ जिलेटीनच्या कांड्या, ३८५००० रुपयांच्या लाल रंगाचे इलेक्ट्रिक डेटोनेटरचे ७ बंडल, ३३००० रुपयांचे मोकळे लाल रंगाचे इलेक्ट्रिक डेटोनेटर ९ मग, १२००० रुपयांचे निळ्या काळ्या रंगाचे अंदाजे २४ फुट लांब सेफ्टी फ्युज आदी वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत.