'दृश्यम' सिनेमा पाहून 2 भावांनी केली वडिलांची हत्या, पुरावे मिटवण्यासाठी जे केलं वाचून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 12:47 PM2022-12-26T12:47:24+5:302022-12-26T12:47:57+5:30
Crime News : आरोपी 22 वर्षीय सुजीत धनंजय बनसोडे हा कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षाला आहे आणि अभिजीत धनंजय बनसोडे हा 18 वर्षांचा असून 12व्या वर्गात आहे.
‘दृश्यम’ ( Drishyam) सिनेमा पाहून दोन तरूणांनी आपल्या 43 वर्षीय वडिलांची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यांनी वडिलांचं शरीर जाळलं. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या घटनेच्या 8 दिवसांनंतर शुक्रवारी दोन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनुसार, मृत व्यक्तीचं नाव धनंजय नवनात बनसोडे होतं. ते एक हॉटेल चालवत होते. 15 आणि 16 डिसेंबर दरम्यान धनंजय यांच्या दोन्ही मुलांनी लोखंडी रॉडने त्यांची हत्या केली. त्यावेळी ते झोपेत होते.
हिंदुस्तान टाइम्सच्या एका वृत्तानुसार, आरोपी 22 वर्षीय सुजीत धनंजय बनसोडे हा कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षाला आहे आणि अभिजीत धनंजय बनसोडे हा 18 वर्षांचा असून 12व्या वर्गात आहे. कथितपणे हृश्यम सिनेमा पाहिल्यावर दोघांनी वडिलांच्या हत्येचा प्लान तयार केला. पोलिसांना चौकशीतून समजलं की, आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी वडिलांचा मृतदेह हॉटेलमधील ‘फरसान भट्टी’मध्ये जाळला. पोलीस म्हणाले की, मृत व्यक्तीचं नागपूरमधील एका महिलेसोबत अफेअर सुरू होतं. यावरून पत्नी आणि मुलांसोबत त्याचा नेहमी वाद होत होता. याच कारणाने दोन्ही भावांनी वडिलांची हत्या केली.
पोलिसांनी सांगितलं की, 15 डिसेंबरला जेव्हा धनंजय नवनाथ बनसोडे रात्री झोपले होते. तेव्हा त्यांच्या मुलांनी लोखंडी रॉडने हल्ला केला आणि नंतर उशीने तोंड दाबून हत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह भट्टीत जाळला. राख आणि हाडे इंद्रायणी नदीच्या किनारी फेकले.
पोलिसांना भरकटवण्यासाठी आरोपींनी 19 डिसेंबरला महालुंगे पोलीस स्टेशनमध्ये वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.