Shraddha Murder Case : श्रद्धा हत्याकांडावर बनले Reels, नेटकऱ्यांची संवेदनशीलता कुठे गेली ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 04:01 PM2022-11-21T16:01:55+5:302022-11-21T16:03:33+5:30

Shraddha Murder Case : एकीकडे श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे सारा देश भयभीत झाला आहे. मात्र दुसरीकडे या प्रकरणाबद्दल काही जणांना ...

instagram-influesncers-made-reels-on-shraddha-murder-case-users | Shraddha Murder Case : श्रद्धा हत्याकांडावर बनले Reels, नेटकऱ्यांची संवेदनशीलता कुठे गेली ?

Shraddha Murder Case : श्रद्धा हत्याकांडावर बनले Reels, नेटकऱ्यांची संवेदनशीलता कुठे गेली ?

googlenewsNext

Shraddha Murder Case : एकीकडे श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे सारा देश भयभीत झाला आहे. मात्र दुसरीकडे या प्रकरणाबद्दल काही जणांना संवेदनशीलताच राहिलेली नाही. देशातील काही Instagram Reels रील्स बहाद्दरांना यातही रील सुचत आहेत. या रील वर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. आपल्याच देशातील एका स्त्री चा निर्घृणरित्या खून होतो आणि या रिल मास्टरांना त्यातही अभिनय सुचतो.  या युझर्सची संवेदनशीलता कुठे गेली असाच प्रश्न पडतो.

Instagram Influencer इंन्स्टाग्रामवरील इन्फ्लुएन्सर आरुष गुप्ताने या हत्याकांडावर रील बनवले आहे. आफताब आणि श्रद्धाची कहाणी त्याने आपल्या अभिनयातुन दाखवली आहे. रडण्याचा अभिनय करत आफताब आणि श्रद्धामध्ये काय काय संवाद झाला असेल हे त्याने मांडले आहे. यामागे त्याचा उद्देश जरी चांगला असला तरी या विषयावर रील वाईट दिसत आहे. तसेच या रील मागे ओम शांती ओम सिनेमातील 'दास्तान ए' हे गाणं सुद्धा लावलं आहे.

या रीलवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. याला वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करा, याचे डोके फिरले आहे अशा संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा काय रीलचा विषय आहे का असा सवाल युझर्सनी केला आहे. इतक्या संवेदनशील विषयाला या इन्फ्लुएन्सर्सनी  मीम करुन टाकले आहे.

दरम्यान आज आफताबची नार्को टेस्ट होणार होती. मात्र त्याआधी करण्यात येणाऱ्या पॉलिग्राफी चाचणीसाठी कोर्टाची परवानगी मिळाली नाही. म्हणून आजची नार्को टेस्ट रद्द करण्यात आली आहे. या परवानग्या मिळवण्यासाठी आणखी १० दिवस लागण्याची शक्यता आहे.

Web Title: instagram-influesncers-made-reels-on-shraddha-murder-case-users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.