मुंबई पोलिसांप्रमाणे 'या' ज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना घरी राहण्याच्या सूचना द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 09:04 PM2020-04-28T21:04:01+5:302020-04-28T21:10:04+5:30

मनसेचे पुष्कर विचारे यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

Instruct 'this' police personnel to stay at home like Mumbai Police pda | मुंबई पोलिसांप्रमाणे 'या' ज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना घरी राहण्याच्या सूचना द्या

मुंबई पोलिसांप्रमाणे 'या' ज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना घरी राहण्याच्या सूचना द्या

Next
ठळक मुद्दे आमचे पोलीस बांधव ड्युटी करताना खऱ्या अर्थाने कोरोनाशी दोन हात करत आहेत. मुंबई पोलिसांनी ज्या पद्धतीने ५५ वर्षे वयावरील पोलीस कर्मचाऱ्यांना घरी राहण्याच्या सूचना केल्या आहेत, निर्णय घेतला आहे.

ठाणे - ठाणे शहरातील व जिल्ह्यातील वय ५५ वर्षे वरील पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी घरी राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात अशी मागणी मनसेचे पुष्कर विचारे यांनी ठाणे पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे.

प्रशासनाला दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, आपले जिल्ह्यातील पोलीस प्रशासन कोविड-१९ या आजाराची वाढ होऊ नये यासाठी जी मेहनत घेत आहात त्यामुळे जिल्ह्यातील लॉक डाऊन अंमलबजावणी काटेकोर होत आहे. आमचे पोलीस बांधव ड्युटी करताना खऱ्या अर्थाने कोरोनाशी दोन हात करत आहेत. विशेष म्हणजे आपले वयाने जेष्ठ असणारे कर्मचारी विनातक्रार आपले कर्तव्य बजावत आहेत. एकीकडे हे वयस्कर कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणेही गरजेचे आहे, असे पुष्कर विचारे यांनी या पत्रात म्हटले आहे.

मुंबई पोलीस दलात आता १२/२४ तासचा फॉर्म्युला, पोलिसांना 'आराम' मिळणार

CoronaVirus :पन्नाशी उलटलेल्या पोलिसांना यापुढे सुट्टी

मुंबईपोलिसांनी ज्या पद्धतीने ५५ वर्षे वयावरील पोलीस कर्मचाऱ्यांना घरी राहण्याच्या सूचना केल्या आहेत, निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर ठाण्यातील पोलिसांच्या आरोग्यासाठी वय ५५ वर्षे  वरील पोलीस कर्मचाऱ्यांना आरोग्याची काळजी म्हणून घरी राहण्याबाबत सूचना द्याव्यात / आदेश द्यावेत अशी मागणी पुष्कर विचारे यांनी आपल्या पत्रात केली आहे. जेष्ठ नागरिकांना असणारा धोका लक्षात घेऊन आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना हा दिलासा द्यावा अशी विनंती त्यांनी या पत्रात पोलीस आयुक्त यांना केली आहे.
 

Web Title: Instruct 'this' police personnel to stay at home like Mumbai Police pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.