सांगलीतील दरोड्यात आंतरराज्य टोळी जेरबंद, मध्य प्रदेशातील तिघे गजाआड

By शीतल पाटील | Published: January 16, 2023 08:20 PM2023-01-16T20:20:03+5:302023-01-16T20:20:53+5:30

संशयित नगर, औरंगाबाद, मध्यप्रदेशातील, तिघांना अटक, सहा फरारी

Inter-state gang jailed in Sangli robbery, three from Madhya Pradesh arrested | सांगलीतील दरोड्यात आंतरराज्य टोळी जेरबंद, मध्य प्रदेशातील तिघे गजाआड

सांगलीतील दरोड्यात आंतरराज्य टोळी जेरबंद, मध्य प्रदेशातील तिघे गजाआड

Next

सांगली : शहरातील कर्नाळ रोडवर बंगल्यावर दरोडा टाकून साडेतीन लाखाचा मुद्देमाल लंपास करणाऱ्याला आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. या दरोड्यात अहमदनगर, औरंगाबाद येथील तीन संशयितांना अटक केली आहे. संशयितांकडून पाच लाखाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. अजून सहा संशयित फरारी असून ते मध्यप्रदेशातील असल्याचे पोलिस अधिक्षक डाॅ. बसवराज तेली यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. अनिल उर्फ अन्या युवरा पिंपळे (वय ४९, रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर), तुकाराम भीमराव घोरवडे (५४. रा. उंडे वस्ती, मातापूर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर), दाजी धनराज सोळंके (३६, रा. हरसूल गायरान, लासूर, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. 

याबाबत माहिती अशी की, शहरातील कर्नाळ रोडवरील दत्तनगर येथे २३ डिसेंबरच्या मध्यरात्री आशिष चिंचवाडे यांच्या बंगल्यावर दरोडा पडला होता. संशयितांनी आशिष यांचे हात बांधून आईला ठार मारण्याची धमकी देत ३ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या दरोड्याचा छडा लावण्यसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, सांगली शहर पोलिस ठाण्याची पथके नियुक्त करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तांत्रिक पद्धतीने तपास करण्यात आला. खबऱ्यामार्फत हा दरोडा अहमदनगर, औरंगाबाग येथील संशयितांनी केल्याची माहिती मिळाली. एलसीबीच्या पथकाने श्रीरामपूर पोलिसांच्या मदतीने अनिल पिंपळे, तुकाराम घोरवडे तर औरंगाबाद पोलिसांच्या मदतीने दाजी सोळंके याला अटक केली. या गुन्ह्यात आणखी सहा जणांचा समावेश आहे. हे संशयित मध्यप्रदेशमधील आहेत. संशयितांकडून ९९ ग्रॅम वजनाचे पाच लाखाचे दागिने जप्त करण्यात आले. अजून दोन लाखाची रोकड हस्तगत करण्यात येणार असल्याचे अधिक्षक तेली यांनी सांगितले.

पाळत ठेवून दरोडा

दरोडा टाकण्याच्या उद्देशाने अटक केलेल्या तिघांसह सहा जण महाराष्ट्र एक्सप्रेसने सांगलीत आले. रेल्वे स्थानकावरून ते बसस्थानकात आले. तिथे वेगवेगळे ग्रुप करून घरफोडीसाठी बंगला शोधण्यास सुरूवात केली. दत्तनगर येथील चिंचवाडे यांचा बंगल्यावर पाळत ठेवली. रात्री नऊ जणांनी घराच्या पाठीमागील दरवाज्याचे कुलुप तोडन आत प्रवेश करीत चोरी केली.

संशयित एकमेकांचे नातलग

संशयित नऊ दरोडेखोर एकमेकाचे नातेवाईक आहेत. नगर, औरंगाबाद, मध्यप्रदेशमधील नातेवाईक एकत्र येऊन दरोडा टाकत होते. यातील संशयित तुकाराम घोरवडे हा मध्यप्रदेशमधील साडेसहा वर्षे तुरूंगात होता. आठ महिन्यापूर्वीच तो तुरूंगातून बाहेर आला होता. या टोळीविरूद्ध छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्रात गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Inter-state gang jailed in Sangli robbery, three from Madhya Pradesh arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.