मुलांचे अपहरण करून विकणारी आंतरराज्य टोळी ताब्यात

By राजन मगरुळकर | Published: March 6, 2023 09:53 PM2023-03-06T21:53:16+5:302023-03-06T21:53:49+5:30

अकरा आरोपी ताब्यात, एक बालक पालकांकडे सुपूर्द

Inter-state gang of kidnapping and selling children arrested, 11 accused arrested | मुलांचे अपहरण करून विकणारी आंतरराज्य टोळी ताब्यात

मुलांचे अपहरण करून विकणारी आंतरराज्य टोळी ताब्यात

googlenewsNext

राजन मंगरुळकर, परभणी: आंतर राज्यात लहान मुलांचे अपहरण करून त्यांना लाखो रुपयांना विकणारी टोळी परभणी पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या तपासातून ताब्यात घेण्यात आली. यात ११ आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून अपहृत केलेल्या मुलांचा शोध लावण्यात आला आहे. यातील एका बालकास खात्री करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

घटनेत ताब्यात घेतलेल्या एकूण ११ आरोपींपैकी ६ जण परभणीतील, तीन विजयवाडा,एक हैदराबाद येथील आहे. अपहरणकर्ते हे त्यांच्या ओळखीच्या असणाऱ्या लोकांच्या लहान मुलांचे अपहरण करीत असत. कोतवाली ठाण्याच्या हद्दीत ६ फेब्रुवारी २०२२ व एक मार्च २०२२ रोजी दाखल झालेल्या दोन अपहरणाच्या घटनेमध्ये जानेवारी २०२३ मध्ये संबंधित पोलिस ठाण्याकडून हे प्रकरण अनैतिक मानवी तस्करी विभागाकडे वर्ग करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक राधिका भावसार, शेख शकील अहमद, किरडे, शिरसकर, शेळके यांनी गुन्ह्यातील अपहृत बालकांच्या व त्यांचे अपहरण करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेतला. तपासामध्ये दोन्ही गुन्ह्यातील अपहृत बालकाचे अपहरण हे अजमेरी कॉलनी येथील महिलेने केल्याचे निष्पन्न झाले. यात महिलेची बहीण व तिचा विधी संघर्ष बालक यांचा सहभाग असल्याचे समजल्याने पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी करून तपास केला. सदरील काम हे हैदराबाद येथे राहणाऱ्या दोघांच्या सांगण्यावरून करत असल्याचे व अपहरण बालकाचे अपहरणाबद्दल एक ते दीड लाख रुपये देत असल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी पुढील शोध घेऊन सदर गुन्ह्यात दहा आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस अधीक्षक रागसुधा. आर, अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण, प्रदीप काकडे, संजय करनूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद मुळे, मारुती करवर, कल्पना राठोड, जी. टी. बाचेवाड, राधिका भावसार, साईनाथ पूयड, मारुती चव्हाण, व्यंकट कुसुमे, नागनाथ तुकडे यांच्यासह क्यूआरटी, स्थागुशा, सायबर पथकाने केली.

ओळखीच्याच मुलांचे अपहरण

सदर अपहरणकर्ते हे त्यांच्या ओळखीच्या असणाऱ्या लोकांच्या लहान मुलांचेच अपहरण करीत होते, असे पोलिस अधीक्षक आर. रागसुधा यांनी सांगितले. आरोपींनी गुंटूर जिल्ह्यातील मंगलगिरी व लातूर जिल्ह्यातील एका अपहरणाच्या गुन्ह्याची देखील कबुली दिली आहे.

Web Title: Inter-state gang of kidnapping and selling children arrested, 11 accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.