इंटरनेट, व्हायग्रा, फेक कॉल्स... लैंगिक शक्तीच्या नावावर लुटत होती मुंबईतील टोळी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 03:22 PM2020-03-22T15:22:53+5:302020-03-22T15:28:16+5:30
लैंगिक गोळ्या ऑनलाईन विकण्याच्या बहाण्याने काही ठगांनी अनेक अमेरिकन लोकांना करोडो रुपयांना चुना लावला.
मुंबई - ठग हे नेहमीच नागरिकांचा कमकुवतपणा जाणून घेतात आणि त्याचा फायदा उचलून त्यांना त्याद्वारे आपल्या जाळ्यात ओढतात आणि त्यांची फसवणूक करतात. मात्र, आपल्यातील कमकुवतपणामुळे असे नागरिक ज्यांची फसवणूक झालेली असते ते पोलिसांकडे तक्रार करायला. लैंगिक गोळ्या विकत घेणे हा सुद्धा एक कमकुवतपणा आहे. लैंगिक गोळ्या ऑनलाईन विकण्याच्या बहाण्याने काही ठगांनी अनेक अमेरिकन लोकांना करोडो रुपयांना चुना लावला. याप्रकरणी पोलीस उपायुक्त अकबर पठाण म्हणाले की, गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने मोहम्मद उसमा अहमद ईशर चौधरी, मुजफ्फर जफर शेख आणि मोहम्मद अल्ताफ सईद मेमन यांना अटक केली आहे.
या ठगांनी एम एस अली मार्गावर छोटा सोनापूर परिसरात एक कॉलसेंटर बांधले होते. तेथे बरेच कर्मचारी ठेवले होते, ज्यांचे इंग्रजी प्रभुत्व आहे आणि बोलण्याचा आवाज, इंग्रजी उच्चार असे होते की एखादा अमेरिकन कॉल करीत असल्यासारखे वाटत असे.
हा फोन इंटरनेटद्वारे वापरला जात होता
पोलीस सांगतात की हे अमेरिकन लोकांना व्हीओआयपीद्वारे (VOIP) कॉल करायचे. त्यांना व्हायग्राच्या वेगवेगळ्या योजना आणि सेक्सशी संबंधित इतर गोळ्यांबाबत माहिती दिली जात असे आणि अधिक गोळ्या मागवून त्यांचा घेतल्यास त्याचा फायदा होऊ शकेल अशी बतावणी करून ऑर्डर घेतली जात असे. जर एखाद्या अमेरिकनने ऑर्डर दिली असेल तर त्याला बँक खाते क्रमांक सांगितला जाई आणि त्यात रक्कम हस्तांतरित करण्यास सांगत. आरोपींना जेव्हा खात्यावर पैसे येत तेव्हा त्यांच्यावर लैंगिक वर्धक गोळ्या त्यांच्या पत्त्यावर पाठविण्याचा दबाब असे. मात्र, समोरची व्यक्ती पैसे ऑनलाईन हस्तांतरित केल्यानंतर आरोपी त्यांना बऱ्याचदा गोळ्या पाठवत नसत आणि त्यांची फसवणूक करत.
कामगारांना भरघोस पगार
आरोपींनी वरिष्ठ निरीक्षक केदारी पवार, निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, सुनील माने आणि अमित भोसले यांच्या तपास पथकाला सांगितले की, ते इंटरनेट कॉल करीत असल्याने त्यांना परदेशातील पोलीस कधीच शोधू शकणार नाहीत हे त्यांना ठाऊक होते. त्यांना हे देखील माहित होते की, पीडित व्यक्तींनी जगात कुठेही सेक्स गोळ्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याची तक्रार केली नाही, म्हणूनच हे लोक फसवणूक करण्याचा त्यांचा व्यवसाय अगदी सहजपणे चालवत होते. गेल्या पाच वर्षांपासून सुरु असलेल्या या कॉल सेंटरवर शुक्रवारी मालमत्ता कक्षाने धाड घातली. या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कामगारांना भरघोस पगार देण्यात येत होता.