कर्जाचे आमिष दाखवून लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा; हरियाणातील महिला आरोपी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 08:58 PM2021-08-20T20:58:19+5:302021-08-20T21:29:49+5:30

Haryana woman accused arrested : दिल्ली, उत्तरप्रदेशमधील आरोपींचा समावेश; अजनी पोलिसांची कामगिरी

Interstate gangs looting under the guise of debt; Haryana woman accused arrested | कर्जाचे आमिष दाखवून लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा; हरियाणातील महिला आरोपी गजाआड

कर्जाचे आमिष दाखवून लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा; हरियाणातील महिला आरोपी गजाआड

Next
ठळक मुद्देपूजा मॅडम ऊर्फ पूजा ओम सिंग (वय ५३) असे या आरोपी महिलेचे नाव आहे.पूजाला न्यायालयात हजर करून तिचा चार दिवसाचा पीसीआर मिळविण्यात आला.

नागपूर : अल्प व्याजदराच्या कर्जाचे आमिष दाखवून देशभरातील ठिकठिकाणच्या नागरिकांचे लाखो रुपये हपडणाऱ्या टोळीतील एका महिलेला अजनी पोलिसांनीअटक केली. पूजा मॅडम उर्फ पूजा सिंग (वय ५३) असे या आरोपी महिलेचे नाव आहे.

पूजा मॅडम ऊर्फ पूजा ओम सिंग (वय ५३) असे या आरोपी महिलेचे नाव आहे. पूजा हरियाणातील हिसार जिल्ह्यातील लाडवा येथील रहिवासी आहे. कमी व्याज दराचे दीर्घ मुदतीचे लाखो रुपयांचे कर्ज झटपट उपलब्ध करून देण्याची थाप मारून वेगवेगळ्या सबबी सांगत लाखो रुपये उकळणारी टोळी पूजा आणि तिचे साथीदार अनेक दिवसापासून संचलित करीत आहे. त्यांनी देशातील विविध प्रांतात अनेकांना अशा प्रकारे लाखोंचा गंडा घातला आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे आणि रेल्वेत कार्यरत असलेले देवानंद अनिल शेंडे यांना या टोळीने आठ लाखांचे कर्ज १० वर्षांकरिता केवळ ६.९ टक्क्याने उपलब्ध करून देण्याची आरोपी पूजा आणि तिच्या साथीदारांनी थाप मारली होती. आपण बजाज फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचीही बतावणी पूजाचे साथीदार आरोपी विकास जैन, दीपक चव्हाण, संजीव कुमार, ओम प्रकाश (रा. जेपी नगर, हरियाणा) यांनी केली होती.


शिंदे यांना आधी कागदपत्रे मागून नंतर वेगवेगळे कारण सांगत आरोपींनी त्यांच्याकडून ९८ हजार रुपये उकळले. कर्ज उपलब्ध करून देण्याऐवजी प्रत्येक वेळी पैसे जमा करण्यास सांगणाऱ्या या टोळीचा संशय आल्यामुळे शेंडे यांनी ‘कर्ज नको, माझी रक्कम मला परत करा’ असे आरोपींना म्हटले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याशी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेंडे यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी शेंडे यांनी जमा केलेली रक्कम कोणत्या खात्यात वळती झाली, ते शोधून त्यावर नमूद संपर्क क्रमांकाच्या आधारे पूजाचा पत्ता काढला. १५ ऑगस्टच्या रात्री अजनीचे ठाणेदार विनोद चाैधरी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शितलकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस पथक तिच्या हरियाणातील गावात पोहचले आणि १६ ऑगस्टला पोलिसांनी तिला अटक केली.


विविध बँकेत खाती, लाखोंची रक्कम

पूजा आणि तिच्या टोळीतील साथीदार हरियाणा, दिल्ली तसेच उत्तरप्रदेशात राहतात. ही टोळी अशा प्रकारे ग्राहकांकडून उकळलेली रक्कम विविध बँक खात्यात जमा करून नंतर ती आपसात वाटून घेते. गेल्या चार महिन्यात या टोळीने अशा प्रकारे अनेकांना गंडा घातला. त्यातून पूजाच्या वाट्याला चार लाखांची रोकड आली आहे. तिच्याकडून पोलिसांनी दोन मोबाईल, विविध बँकांचे पासबूक, एटीएम कार्ड आणि अन्य चिजवस्तू जप्त केल्या.
 

चार दिवसाचा पीसीआर

पूजाला न्यायालयात हजर करून तिचा चार दिवसाचा पीसीआर मिळविण्यात आला. तिच्याकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असून पोलीस आता तिच्या फरार साथीदारांचा शोध घेत आहेत. परिमंडळ चारचे उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे, सहायक आयुक्त डॉ. नीलेश पारवे, ठाणेदार विनोद चाैधरी, विजय तलवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शितलकुमार गायकवाड, हवलदार अविनाश श्रीरामे, सुरेश सायरे, सविता वर्मा आणि सायबर सेलचे नायक दीपक यांनी ही कामगिरी बजावली.

Web Title: Interstate gangs looting under the guise of debt; Haryana woman accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.