सावंतवाडीतील दुहेरी हत्याकांडाचा तपास निर्णयाक वळणावर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 09:44 PM2021-11-08T21:44:42+5:302021-11-08T21:45:35+5:30
ठोस पुरावे गोळा करणे सुरू; फोरेन्सिक अहवालाची प्रतिक्षा
सावंतवाडी :सावंतवाडी शहरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा तपास निर्णयाक वळणावर येऊन थांबला असून काहि परस्थीती जन्य पुरावे पोलीसांना हवे असून पोलीस ठसे तज्ञ व फोरेन्सिक अहवालाचीही मदत घेऊन आरोपी पर्यंत पोचण्याचा विचार करत आहे त्यामुळे पोलीस काहि दिवस थांबून या अहवालाची प्रतिक्षा करत आहेत. मात्र पोलीसांना अद्याप हत्ये मागचे कारण शोधण्यात यश आले नसले तरी संशयित ताब्यात आल्यानंतरच हत्येच्या कारणाचा उघड होईल असा दावा पोलीस करतना दिसत आहेत.
सावंतवाडी शहरातील उभाबाजार परिसरात दोन वृद्ध महिलांचे हत्याकांड घडून आठवडा उलटून गेला तरी पोलीसांच्या हाती काहिच लागले नाही निलिमा खानविलकर व शालिनी सावंत अशा या वृध्द महिलांच्या हत्याकांडाने सावंतवाडी च नाही तर पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हाच हादरून गेला होता पण पोलीस अद्याप पर्यत हत्येचे कारण शोधण्यातच व्यस्त होते पण अद्याप पर्यत हत्ये मागचे कारण पोलीसांना सापडत नव्हते.
मात्र हा सर्व तपास करत असतना पोलीसांना एक एक कडी जुळत गेली आणि हा तपास उलगडण्याच्या अगदी निर्णायक टप्प्यावर येऊन थांबला आहे.पुढील कारवाई करण्या पूर्वो पोलीस सीसीटीव्ही फुटेज तसेच ठसे तज्ञ व फोरेन्सिक अहवालाची मदत घेत असून हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्याच्या मानसिकतेत पोलीस येऊन थांबले आहेत आतापर्यंत पोलीसांनी अनेकांचे जबाब नोंदवले चौकशी केली पण या चौकशीतून काही हाती लागले नसल्याचे दिसून येत आहे.
पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांना विचारले असता तपास अंतिम टप्प्यात आहे.आम्ही माहीती घेत असून जस जशी माहिती मिळते त्या माहितीवर काम करणे सुरू ठोस पुरावे मिळाल्यानंतर च आम्ही तपास लागला असे म्हणू शकतो असे कोरे यांनी स्पष्ट केले आहे.