आयएनएक्स मीडिया प्रकरण : पी. चिदंबरम यांची तिहार तुरुंगात रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 06:04 PM2019-09-05T18:04:06+5:302019-09-05T18:06:42+5:30
INX Media Case: अटकेत असलेल्या पी. चिदंबरम यांचा जामीन अर्ज आज सुप्रीम न्यायालयाने फेटाळला आहे.
नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया प्रकरणी केंद्रीय अन्वेषण (सीबीआय) विभागाच्या कोठडीत असलेल्या माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना कोर्टाने १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडी न देता सीबीआयच्याच कोठडीत ठेवावे असा युक्तीवाद केला होता. मात्र, विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांनी सिब्बल यांचा हा युक्तीवाद फेटाळून लावत चिदंबरम यांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
#WATCH Delhi: P Chidambaram waves as he is being taken in a Police bus to Tihar Jail. The Court has remanded him to judicial custody till September 19 in CBI case in INX media matter pic.twitter.com/Z9bki5zYIv
— ANI (@ANI) September 5, 2019
अटकेत असलेल्या पी. चिदंबरम यांचा जामीन अर्ज आज सुप्रीम न्यायालयाने फेटाळला आहे. चिदंबरम यांनी दिल्ली हायकोर्टाकडून नाकारण्यात आलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेत निर्णयाला आव्हान दिलं होतं. मात्र, सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. आयएनएक्स मीडिया प्रकरणी सीबीआय तपास करीत आहे. सीबीआयसोबत ईडीकडूनदेखील या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया प्रकरणी पी. चिदंबरम यांना १४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) September 5, 2019
मागील सुनावणीदरम्यान म्हणजेच सोमवारी सुप्रीम कोर्टाने ५ सप्टेंबरपर्यंत पी. चिदंबरम यांची सीबीआय कोठडी कायम ठेवली होती. त्यामुळे पी. चिदंबरम यांना अंशतः दिलासा मिळाला. कारण सुप्रीम कोर्टाने तिहार तुरुंगात चिदंबरम यांची रवानगी करु नये असे म्हटले होते. तुरुंगात पाठवण्याऐवजी नजरकैदेत ठेवा असा प्रस्ताव चिदंबरम यांनी कोर्टाला दिला होता. त्यानंतर आयएनएक्स मीडिया प्रकरणी पी.चिदंबरम यांना तिहार तुरुंगात पाठवले जाऊ नये असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. आता याच संदर्भात सीबीआयने पुन्हा एकदा पी. चिदंबरम यांची रवानगी तिहार तुरुंगात करावी असं म्हटलं होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने चिदंबरम यांना ५ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आणि थोडा दिलासा दिला होता. आज मात्र कोर्टाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. आयएनएक्स मीडियाप्रकरणी चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने नाट्यमयरित्या अटक केली होती. सीबीआयबरोबरच ईडी देखील या प्रकरणाची चौकशी करीत आहे.
INX media case: P Chidambaram's lawyer Kapil Sibal says in Court, "As far as CBI is concerned why should I (P Chidambaram) be sent to judicial custody? They've asked all questions. I'm willing to go to ED’s custody. I should not be sent to judicial custody."
— ANI (@ANI) September 5, 2019
P Chidambaram files application before Delhi court seeking direction to ensure safe detention while in judicial custody. He also seeks direction for jail authorities to provide adequate security to him. He also seeks direction to provide separate cell with adequate security. https://t.co/Ct7IEbFTc3
— ANI (@ANI) September 5, 2019
INX media case: P Chidambaram's lawyers have also moved an application in Court stating that Chidambaram wants to surrender in Enforcement Directorate case
— ANI (@ANI) September 5, 2019