IPL 2022, RR vs GT: तुफानी फटकेबाजीनंतर हार्दिक पांड्याचा रॉकेट थ्रो, स्टम्पचे झाले दोन तुकडे, पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 08:51 AM2022-04-15T08:51:11+5:302022-04-15T08:52:28+5:30
IPL 2022, Hardik pandya: आयपीएलमध्ये काल झालेल्या लढतीत गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला ३७ धावांनी पराभूत केले. या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचा जलवा पाहायला मिळाला.
मुंबई - आयपीएलमध्ये काल झालेल्या लढतीत गुजरात टायटन्सनेराजस्थान रॉयल्सला ३७ धावांनी पराभूत केले. या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचा जलवा पाहायला मिळाला. हार्दिक पांड्यानेराजस्थान रॉयल्सविरुद्धच्या लढतीत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही क्षेत्रात आपला जलवा दाखवला.
या सामन्यात हार्दिक पांड्याने ५२ चेंडूत ८७ धावा कुटल्या. तर गोलंदाजीमध्ये एक बळीही टिपला. दरम्यान, हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीबरोबरच त्याने सामन्यात केलेल्या एका रॉकेट थ्रोची चर्चाही रंगली आहे. हा थ्रो पाहून क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याचे झाले असे की, राजस्थान रॉयल्सच्या डावातील आठव्या षटकात हार्दिक पांड्याने एका रॉकेट थ्रोवर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याला धावबाद केले. एवढेच नाही तर हा थ्रो एवढा भन्नाट होता की, चेंडू स्टम्पला लागल्यावर स्टम्प मधून मोडला आणि त्याचे दोन तुकडे झाले. हे दृश्य पाहून स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षकही आश्चर्यचकीत झाले.
— Peep (@Peep_at_me) April 14, 2022
सॅमसनने मिड ऑफच्या दिशेने शॉट मारून एक धाव चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे दक्ष असलेल्या हार्दित पांड्याने चेंडू अडवून स्टम्पच्या दिशेने थेट फेकला आणि सॅमसनला धावबाद केले. या फेकीवर मधला स्टम्प मोडला. त्यामुळे सामना काही काळासाठी थांबवावा लागला. संजू सॅमसनने ११ चेंडूत ११ धावा केल्या.
तत्पूर्वी हार्दिक पांड्याने राजस्थानला आपल्या बॅटचाही चांगलाच इंगा दाखवला. त्याने ५२ चेंडूत ८७ धावांची तुफानी खेळी केली. त्याने या खेळीमध्ये ८ चौकार आणि ४ षटकार ठोकले. त्याशिवाय त्याने एक बळीही मिळवला.