IPL 2023, Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Live Marathi : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने उभ्या केलेल्या १८२ धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याच पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सकडून आक्रमक सुरुवात झाली. फिल सॉल्ट व डेव्हिड वॉर्नर यांनी अवघ्या ४.१ षटकांत अर्धशतकी भागीदारी केली. पण, यांची भागीदारी RCBचा गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या डोक्यात गेलेली पाहायला मिळाली. सॉल्टने पाचव्या षटकात सिराजच्या गोलंदाजीवर ६,६,४ असे फटके खेचले अन् त्यामुळे सिराज आधीच चिडला होता. त्याच चौथ्या चेंडूवर असे काहीतरी घडले की जोरदार खटका उडाला.
डेव्हिड वॉर्नर - दिनेश कार्तिक भिडले; अम्पायरकडे झाली तक्रार, समजून घ्या नेमका प्रकार
फॅफ ड्यू प्लेसिस ( ४५) व विराट कोहली ( ५५) यांनी पहिल्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. मिचेल मार्शने फॅफ आणि ग्लेन मॅक्सवल ( ०) यांना सलग दोन चेंडूवर माघारी पाठवले. विराट व महिपाल लोम्रोर यांनी ३२ चेंडूंत ५५ धावांची भागीदारी केली. कार्तिक ११ धावांवर वॉर्नरच्या हाती झेलबाद झाला. महिपाल २९ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावांवर नाबाद राहिला. RCB ने ४ बाद १८१ धावा केल्या.
फिल सॉल्ट व डेव्हिड वॉर्नर आज वेगळ्याच मूड मध्ये दिसले अन् त्यांनी सुरुवातीपासूनच आक्रमणाला सुरूवात केली. आतापर्यंत संथ खेळीमुळे टीकेचा सामना करणारा वॉर्नर सुसाट सुटलेला... फिल सॉल्टची त्याला तोडीसतोड साथ मिळाली आणि दोघांनी ५.१ षटकांत ६० धावा फलकावर चढवल्या. जोश हेझलवूडने वॉर्नरची ( २२) विकेट मिळवून दिली. पण, त्याआधीच्या षटकात सिराजच्या गोलंदाजाची सॉल्टने धुलाई केली. १९ धावा त्या षटकात आल्या. सॉल्टने पहिले तीन चेंडू ६,६,४ असे भिरकावून लावले. चौथा चेंडू सिराजने बाऊन्सर टाकला अन् सॉल्टने हाईटचा इशारा करताना अम्पायरकडे Wide ची मागणी केली. त्याआधीच अम्पायरने निर्णय दिला होता. पण, सॉल्टचा इशारा पाहून सिराज भडकला अन् त्याच्या अंगावर धावला, भांडण सोडवण्यासाठी आलेल्या वॉर्नरवरही तो भडकलेला दिसला.
Web Title: IPL 2023, RCB vs DC Live Marathi : Heated conversation between Mohammad Siraj and Delhi Capitals openers, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.