गोव्यात आयपीएलवर सट्टा घेणारे पाज जण अटकेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 01:04 PM2020-10-11T13:04:29+5:302020-10-11T13:04:44+5:30
Ipl 2020 Betting बागा येथील ताओ पॅलेसमध्ये आयपीएलच्या चेन्नेई सुपर किंग्स व रॉयल चॅलेजर्स बेंगलोर या सामन्यावर सट्टा घेतला जात असल्याची माहिती कळंगूट पोलिसांना मिळाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंगूट : आयपीएल क्रिकेट सामान्यांवर आॅनलाइन सट्टा घेणारे आणखी एक रॅकेट कळंगूट पोलिसांनी उघडीस आणले. पोलिसांनी बागा येथील ‘ताओ पॅलेस’ या हॉटेलमध्ये छापा टाकून पाच तरुणांना अटक केली. त्यांच्याकडून १५ मोबाईल संच, ३ लॅपटॉप, रोख २५,४४० रुपये मिळून एकूण २ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. महिन्याभरात कळंगूट पोलीस ठाण्यात आयपीएल बेंटिग प्रकरणी तिसरा गुन्हा नोंद झाला.
बागा येथील ताओ पॅलेसमध्ये आयपीएलच्या चेन्नेई सुपर किंग्स व रॉयल चॅलेजर्स बेंगलोर या सामन्यावर सट्टा घेतला जात असल्याची माहिती कळंगूट पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक राजाराम भागकर, हेड कॉन्स्टेबल विनोद नाईक, कॉन्स्टेबल विनय श्रीवास्तव या पथकाने या पॅलेसमध्ये छापा टाकला. यावेळी संशयित हे सट्टा घेत असल्याचे आढळले.
याप्रकरणी मनोज थडानी (३९, इंदोर, एमपी), बंटी डांगी (३२, इंदोर, एमपी), चिंटू धोईधोय (२८, इंदोर, एमपी), रूपेश सिंग (४१, मुंबई) व जगदीश नेपाळी (४७, नेपाल) या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून त्यांच्याकडून १५ मोबाईल संच, ३ लॅपटॉप, २५ हजार ४४० रुपयांची रोकड मिळून २ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांवर गोवा सार्वजनिक जुगार कायद्याच्या कलम ३ आणि ४ चे उल्लंघन केल्याबद्दल कळंगूट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला.
दरम्यान, पुढील तपास उपनिरीक्षक विकास देयकर हे पोलीस अधीक्षक उत्क्रिष्ट प्रसून, उपअधीक्षक एडविन कुलासो व पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्या देखरेखीखाली करीत आहेत.